Monday, August 31, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस

Ø माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी

चंद्रपूर( जीमाका):  पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात आले. या अभियानात राज्यातील 27895 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. यात चंद्रपूर  जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींचा समावेश होता. ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय, विभागस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार, उंच उडी पुरस्कार आणि भुमी थिमॅटीक पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत एकूण 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस मिळविले.
या अभियानात उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची नावे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे घोषित केली. यामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर तसेच विभाग स्तरावर उतुंग कामगिरी करीत पुरस्कार प्राप्त केले. यात राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार सावली तालुक्यातील जिबगाव ग्रामपंचायत (75 लक्ष रुपये), चिखली ग्रामपंचायत (1 कोटी रुपये), विभागस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), मुल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), उंच उडी पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), भुमी थिमॅटिक पुरस्कार सावली तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये) असे एकूण 3 कोटी 75 लक्ष रुपयांचे पुरस्कार ग्रामपंचायतींनी पटकाविले आहे.
मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून अभिनंदन : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी 3 कोटी 75 लक्ष किंमतीचे पुरस्कार प्राप्त केले असून जिल्ह्याकरीता ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव व नागरीक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे देखील कौतुक केले.
पृथ्वी, जल, वायु, अग्नी, आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटीबध्द असून त्याकरीता माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 टक्के  ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आल्याचे पुलकित सिंह यांनी सांगितले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page