Monday, May 25, 2026
HomeBhadrawatiपरंपरेला फाटा देत सौ. शुभांगी कुत्तरमारे यांनी गृहस्थाश्रम प्रवेश पुजनाने घातला नवा...
spot_img

परंपरेला फाटा देत सौ. शुभांगी कुत्तरमारे यांनी गृहस्थाश्रम प्रवेश पुजनाने घातला नवा पायंडा…..

परंपरेला फाटा देत सौ. शुभांगी कुत्तरमारे यांनी गृहस्थाश्रम प्रवेश पुजनाने घातला नवा पायंडा…..

माथनकर परिवाराने ग्रामगीता विवाह संस्कारातुन समाजाला दिला आदर्श…

ज्योत्स्ना वानखेडे:

भद्रावती येथील संजय माथनकर यांच्या घरी लग्नसमारंभात परंपरेला फाटा देत विवाहोपरांत पूजनाच्या वेळी पूरोहिताकडून पूजा करण्याऐवजी महिला गुरुदेव प्रचारिका सौ शुभांगी कुत्तरमारे यांनी ग्रामगीता प्रणित  संसार परमाधर्म या अध्यायाचे वाचन करून नवदाम्पत्यांना  गृहस्थ धर्माचे महत्व पटवून दिले व नवा आदर्श  व पायंडा घातला.

 विवाह हा समारंभ आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व विशेषतः पुर्वापार चालत आलेल्या विविध प्रथा व परंपरा पाळत  श्रध्देने पूर्वक पार पाडत असतो. विवाह संस्कारांच्या अशा अनेक परंपरा आपल्या समाजात असतांना काळाच्या ओघात कितीतरी प्रथा व परंपरा या कालबाह्य झालेल्या आहेत. तरीही केवळ प्रतिष्ठा, समाजभिती तसेच अज्ञानापोटी आपण त्या परंपरांचे अनुसरण करीत असतो.

युगप्रवर्तक संत वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता या ग्रंथात अशाच चुकीच्या प्रथा परंपरांच्या  विरोधात जोरदार टीका करीत म्हणतात की ,

*ऐशा ज्या ज्या चालीरीती। झुगारोनी द्याव्या हातोहाती।*

*पुन्हा करावी नविन निर्मीती। समाज नियमांची।।*

कोणतीही प्रथा वा परंपरा जेव्हा आपण पाळत असतो तेव्हा त्यांचा परिणाम  व्यक्ती व कुटुंबासोबतच संपूर्ण समाजव्यवस्थेवर होत असतो. प्रथा परंपरा या मागे लागण्यापेक्षा  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की,

जाणत्यांने तत्वे अभ्यासावी। रुपांतरे व्यवहारात आणावी।

बिघडली घडी दुरुस्त करावी। समाजाची।।

याच ग्रामगीता संतविचारातुन भद्रावती येथील संजय माथनकर परिवारामध्ये नुकतेच मुलाचे विवाह कार्य पार पडले . माथनकर परिवार हे प्रतिष्ठित व उच्चशिक्षित  तसेच सधन परिवार आहे.  आदर्श शिक्षक  संजय माथनकर यांचे चिरंजीव संकेत व  नववधू सौ. आकांक्षा हे दोघेही उच्चशिक्षित असुन मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

 विवाहोपरांत दुसऱ्या दिवशी घरी पूजेची परंपरा पाळली जाते . परन्तू या परंपरेला बगल देत माथनकर परिवारांने पुरोहीतांच्या ऐवजी महिला गुरुदेव प्रचारीका  ग्रामगीताचार्य सौ. शुभांगी गुणवंत कुत्तरमारे यांचे कडुन पुजा करवुन घेतली.  कार्यक्रम प्रसंगी सौ. शुभांगाताईंनी गृहस्थाश्रम प्रवेश पुजा करीत  *ग्रामगीतेतील संसार-परमार्थ* या अध्यायाचे वाचन करून नवदाम्पत्यांना गृहस्थधर्माचे महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले . तत्पूर्वी त्यांची मुलगी कु. आर्या गुणवंत कुत्तरमारे हिने श्रीमदभगवत गीतेतील श्लोक पठण करून विधिवत पूजन केले .

आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असतांना सुद्धा सुशिक्षित मानवी मनावर अंधश्रद्धांमुळे भितीचा पगडा कायम आहे. कोणत्याही प्रथा वा परंपरा पाळत असतांना  पोकळ अंधश्रद्धेच्या आहारी न जाता बुध्दीप्रामाण्यवाद स्विकारुन वाटचाल केल्यास स्वतःसोबतच समाजाचे जीवन सुध्दा  पोषक व प्रेरणादायी करू शकतो. सर्व थोरामोठ्यांच्या उपस्थितीत कालबाह्य परंपरेला फाटा देऊन संतविचारातुन गृहस्थाश्रम प्रवेश पुजन केल्याबद्दल या आदर्शवत कार्यामुळे माथनकर परिवाराचे  व महिला गुरुदेव प्रचारीका सौ शुभांगी कुत्तरमारे यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचे गुरुदेव परिवारातून व समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page