पाच दिवसीय निवासी धम्मशिबिराचे आयोजन
ज्योत्स्ना वानखेडे:
त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र चंद्रपुर द्वारे पाच दिवसीय निवासी ध्यान व धम्म शिबिराचे आयोजन संध्यास्मृति विहार, ताडोबा रोड, पदमापुर (चंद्रपुर) येथे केले आहे. दि. २८ फेब्रु. ते ५ मार्च २०२६ या कालावधित “बुद्धाचा सामाजिक एकतेचा संदेश” या विषयावर विचारमंथन केल्या जाईल. सोबतच ध्यान सराव, धम्मचर्चा, संपर्क सराव, प्रवचन इत्यादि कार्यक्रमाद्वारे धम्म अधिक प्रभावीपणे जानून घेण्याची संधी उपलब्ध होनार आहे. धम्मचारिणी पुष्पप्रभा (वर्धा) या शिबीराचे नेतृत्व करणार आहेत. तसेच धम्मचारी महास्ताम (अमरावती), धम्मचारी विवेकप्रभ, धम्मचारी संघशील यांची विशेष उपस्थिति राहणार आहे. तरी सदर शीबिराची नोंदणी स्थानिक धम्ममित्रांशी संपर्क करुन करावी व आयोजित धम्मशिबीराचा लाभ घ्यावा अशी नम्र सूचना धम्मचारी रत्ननायक चंद्रपुर आणि संघ सदस्याद्वारे करन्यात येत आहे.