Wednesday, April 15, 2026
HomeChandrapurआ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; २००४ घरांसाठी सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला...
spot_img

आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; २००४ घरांसाठी सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार साकार!
आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; २००४ घरांसाठी सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; पहिल्या टप्प्यात गरीबांसाठी घरकुल योजना साकार होण्याच्या मार्गावर
चंद्रपूरकरांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

Jyotsna Wankhede : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आता चंद्रपूरकरांचे हक्काच्या घराचे स्वप्नही साकार होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश मिळाले आहे. नवीन चंद्रपूर (म्हाडा कॉलनी) परिसरात गरिबांसाठी उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनंतर्गत २३० कोटी रुपयांच्या २००४ घरांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वीच १० हजार घरकुल प्रकल्पाची संकल्पना मांडत, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी पुढाकार घेतला होता. याच अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री पंकज भोयर तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन या योजनेला गती दिली होती.

या सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुराव्याचा परिपाक म्हणूनच पहिल्या टप्प्यातील २००४ घरांना मंजुरी मिळाली असून, येत्या काळात उर्वरित घरकुल प्रकल्पालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या निर्णयामुळे चंद्रपूर शहरातील गरजू व मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, “प्रत्येकाला स्वतःचे घर” हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या या मंजुरीनंतर चंद्रपूरकरांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानत, त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
चंद्रपूरचा सुसज्ज व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पुढाकार घेत गायत्री शक्तिपीठ परिसराची पाहणी करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले. रस्ते चौपदरीकरण, पार्किंग व सौंदर्यकरणाचे नियोजन करण्यात आले असून, म्हाडाच्या जागेत ऑक्सिजन पार्क, गार्डन व नागरिकांसाठी सुविधा उभारण्याची योजना आहे. तसेच पोलिस गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, नागपूर रोड ते देवाडा शिव ३० मीटर रस्त्याच्या प्रस्तावाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नवीन चंद्रपूरसाठी आग्रही
नवीन चंद्रपूर  घडविण्याच्या ध्येयाने आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने आग्रही आहे. शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर ठोस पुढाकार घेतला आहे. पायाभूत सुविधा, सुशोभीकरण, स्वच्छता, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, तसेच सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने पाठपुरावा करत यश मिळवले आहे. यामुळे विकासाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करत चंद्रपूरला आधुनिक, सुबक आणि नागरिकांसाठी अधिक सुसज्ज शहर बनवण्याचा त्यांचा दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो. त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळेच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळत असून, ‘नवीन चंद्रपूर’च्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार मिळत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page