Monday, September 14, 2026
spot_img
HomeElectionबल्लारपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

बल्लारपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

बल्लारपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

श्रेयश वानखेडे:

विधानसभा क्रमांक ७२ बल्लारपूर-मुल विधानसभा मतदारसंघातील बल्लारपूर शहरात शांततेत मतदान पार पडले. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आणि बल्लारपूर शहरातील एकूण ८९ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध पक्षांनी प्रत्येक चौकात मदत केंद्रे सुरू केली होती. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी व्हीलचेअर, चौकशी केंद्र, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बल्लारपूर पोलिसांनी पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत भोयर, अंबादास टोपले, राजेंद्र गायकवाड, शब्बीर खान पठाण, मदन दिवटे, मिर्मल बाबर, पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह, विक्की लोखंडे, प्रेमशाह सोयाम, गोविंद चाटे, मीनल कापगते, अभिषेक जंगमवार, गोविंद चाटे, सफौ गजानन डोईफोडे यांच्यासह सर्व ८९ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी ३ वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी शहराला भेट देऊन मतदानाची माहिती घेतली, तसेच मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केले. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. याशिवाय सायंकाळी ५ वाजता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहराला भेट देत कार्यकर्त्यांची भेट घेतली. अपक्ष उमेदवार डॉ अभिलाषा ताई गावतुरे यांनीही बल्लारपूर शहराला भेट देत कार्यकर्त्यांची भेट घेतली तसेच मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page