Sunday, September 13, 2026
spot_img
Homeबल्लारपूरजागतिक महिला दिवस – २०२६ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

जागतिक महिला दिवस – २०२६ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

जागतिक महिला दिवस – २०२६ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

Jyotsna Wankhede:
भा.ज.पा. बल्लारपूर शहर महिला मोर्चा तर्फे जागतिक महिला दिवस – २०२६ निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष बैठक संपन्न झाली. ही बैठक ७२ – बल्लारपूर विधानसभा प्रमुख मा. श्री. चंदनसिंह चंदेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
दि. १४ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते व विकासपुरुष मा. ना. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
या बैठकीत महिला मोर्चाच्या सर्व ८९ बूथ प्रमुखांसह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
बैठकीस भा.ज.पा. शहराध्यक्ष व महिला-पुरुष बूथ सशक्तीकरण अभियान प्रमुख अॅड. रणंजय सिंह, महामंत्री श्री. घनश्याम बुरडकर, श्री. सतीश कनकम, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, ज्येष्ठ नेत्या सौ. रेणुका दुधे, नगरसेविका सौ. शालू कुम्हरे, सौ. विद्या खडतड, महिला बूथ शक्तिकेंद्र प्रमुख व महामंत्री सौ. आरतीताई अक्केवार, सौ. वर्षाताई सुन्चुवार, सौ. सारिकाताई कनकम, सौ. कांताताई ढोके, महिला बूथ शक्तिकेंद्र प्रमुख व शहर महामंत्री सौ. जयश्रीताई मोहुर्ले, महिला बूथ शक्तिकेंद्र प्रमुख सौ. वनीता चक्रवाती, सौ. गुलशन खान, सौ. दीपमाला यादव, सौ. गायत्री हिरण, सौ. उत्तरा सोंत्ताके, सौ. नजमा खान, सौ. सुनीता निवलकर, सोनाली भटारकर, माजी नगरसेविका सौ. सुवर्ण भटारकर, सोशल मीडिया प्रमुख सौ. प्रियंका शेंडे, सौ. सुभांगी जाधव, ज्येष्ठ नेत्या सौ. उन्नती टेकाडे, श्रीमती सय्यदा मॅडम तसेच महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page