Thursday, April 16, 2026
HomeChandrapurलोहाडोंगरी प्रकल्प रद्द व्हावा- चांदा इको केअर फाउंडेशन.
spot_img

लोहाडोंगरी प्रकल्प रद्द व्हावा- चांदा इको केअर फाउंडेशन.

लोहाडोंगरी प्रकल्प रद्द व्हावा- चांदा इको केअर फाउंडेशन.

Jyotsna Wankhede:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कारीडोरमध्ये शासनाने लोहाडोंगरी प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या विरोधात इको प्रो संस्थेचे अध्यक्ष श्री बंडू धोत्रे यांच्या  अन्नत्याग आंदोलनास आम्ही आमच्या चांदा इको केअर फाउंडेशन संस्थेतर्फे संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत आहोत.
 ताडोबा अंधारी कारीडोर प्रकल्पात शासन खनिज उत्खननाकरिता लोहाडोंगरी प्रकल्पाला मंजुरी देऊन येथील वन्य जीवन व वन्यप्राणी संरक्षणाला मोठा धोका उत्पन्न करीत असून चंद्रपूर जिल्ह्यातील वृक्षसंपदा नष्ट करून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात भर टाकीत आहे.
तसेच वन्य जीवन व मानव यांच्या संघर्षात वाढ करीत आहे.
म्हणून लोहाडोंगरी प्रकल्पाला चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा विरोध असून शासनाने हा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा अशी आमची मागणी आहे.
 आम्ही अन्नत्याग आंदोलनास संपूर्ण समर्थन देत असून शासनाने लवकरात लवकर आपल्या आंदोलनाची दखल घेऊन आपल्या मागण्या मान्य कराव्या ही विनंती करीत आहे, असे समर्थनाचे पत्र चांदाई को केअर फाउंडेशन तर्फे संस्थेचे अध्यक्ष विवेक आंबेकर, सचिव पद्माकर मोरे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर, अतुल अल्याडवार ,अतुल देवतळे यांनी इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना दिले व या प्रकरणाकरिता चंद्रपूर जिल्हा बंदचे आव्हान करण्यात यावे ही विनंती करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page