Friday, April 17, 2026
HomeParbhaniमहिला दिनानिमित्त वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न.
spot_img

महिला दिनानिमित्त वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न.

महिला दिनानिमित्त वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न.

ज्योत्स्ना वानखेडे: दि. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी नगर हनुमान मंदीर परिसरात शालेय विद्यार्थीनी साठी वेशभुषा स्पर्धेचे व 51कर्तत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

शहरातील कै . डॉ . अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , आस्था सेवाभावी संस्था, अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ता सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत सन्मान नारिशक्तीचा व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन 9 मार्च सोमवार रोजी

नगराध्यक्ष मिलींद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या कार्यक्रमा च्या अध्यक्षा मंगल अशोकराव जोगदंड , उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, डॉ. अशोकराव नाईकनवरे, माजी सैनिक सखाराम महाजन , डॉ. ऋतुराज साडेगावकर, नगरसेविका शांता बाई प्रकाशसिंह रघुवंशी , सामाजिक कार्यकर्ता सुनील गायकवाड , नगरसेवक डॉ. अनिकेत जोगदंड, उदय निर्वळ , प्रशांत ठाकुर,डॉ. आशिष मेहता आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाले. या कार्यक्रमात सेलू शहरातील एकून ७२ स्पर्धकांनी सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील महिलाची वेशभूषा साकारली प्रास्ताविक  सुनील गायकवाड यांनी केले ते म्हणाले की ,जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशुरांचा आहे त्यांच्यामुळे माझ्यावर जो विश्वास दाखवत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. या वर्षी मुलींसाठी वेशभुषा व 51 महिलाचा सन्मान आहे. मागील 5 वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवले हे 6 वे वर्ष आहे.

वेषभूषाचे परिक्षक म्हणून प्रा . ए. डी. कुलकर्णी , रोहिणी कुलकर्णी , मंजुषा बोराडे यांनी परिक्षण केले. ए डी कुलकर्णी यांनी स्पर्धेचे निकाल जाहिर केला.

वेशपूषा स्पर्धा गट अ 1 ली ते 4

प्रथम – भाग्यश्री महादेव बोराडे नूतन प्राथमिक शाळा 2100 रु

व्दितीय – गीताजंली पवन मिटकरी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कुल 1500 रू,

तृतीय हिंदवी लक्ष्मण आवटे नूतन इंग्लिश स्कूल 1100 रु

उत्तेजनार्थ – राजलक्ष्मी नितीन कुंभकर्ण स्वामी विवेकानंद स्मृतीचिन्ह.

गट ब 5 वी ते 7 वी

प्रथम- ऋतुजा राहूल महाजन नूतन विद्यालय 2100 रु

व्दितीय – आदिश्री माधव आकाशे उत्कर्ष विद्यालय 1500/- रु.

तृतीय – अंतरा मुंजाभाऊ टरपले केशवराज विद्यालय 1100 रु

उतेजनार्थ – दाक्षायणी गोपाल इघवे केशवराज विद्यालय स्मृति चिन्ह या विजेत्या स्पर्धकांना

मंगल जोगदंड , डॉ प्रिती मेहेता , सुनीता देशमुख , ललीता गिल्डा , करूणा कुलकर्णी , निर्मला लिपणे , सिमा ठाकूर , मोहिनी गायकवाड , यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रचंलन डॉ. काशिनाथ पलेवाड , यादी वाचन प्रा. सुष्मिता गाजरे तर आभर शुकाचार्य शिंदे , तर कार्यक्रमा च्या यशश्वीतेसाठी के. डी. वाघमारे , प्रशांत ठाकूर,पि. के. शिंदे , रामप्रसाद बोराडे, नागोराव देशमुख, पद्माकर वाकडीकर , श्रीपाद रोडगे ,पांडूरंग पाटनकर, भगवान पावडे, रविंद्र पाठक, रवि सावंत , श्रीराम रेंगे,डि. डी. सोन्नेकर, पंकज चव्हाण, बालाजी वानरे, शैलेश रामपुरकर अदिनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page