Saturday, September 19, 2026
spot_img
HomeJayantiवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके जयंती उत्साहात साजरी

वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके जयंती उत्साहात साजरी

वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Jyotsna Wankhede:

महान स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आज स्थानिक स्तरावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केला.

यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके हे आदिवासी समाजातून उदयास आलेले धाडसी आणि स्वाभिमानी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक कारभाराविरुद्ध ठामपणे आवाज उठवत स्थानिक जनतेला एकत्र केले आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम काळात त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले होते. देशभक्ती, धैर्य आणि स्वाभिमान यांचे ते प्रेरणादायी प्रतीक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलन कडू, रवी लोणकर, विशाल निंबाळकर, प्रकाश धरणे, नम्रता ठेमसकर, मनोज सिंघवी, रामपाल सिंग, बंडू गौरकर, धनराज कोवे, विक्की मेश्राम तसेच शांताराम उईके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page