Wednesday, April 15, 2026
HomeSanghtanaश्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर- बामणीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मुलींच्या...
spot_img

श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर- बामणीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मुलींच्या वस्तीगृहातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना निरोप

श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर- बामणीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मुलींच्या वस्तीगृहातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना निरोप

ज्योत्स्ना वानखेडे:

श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, बल्लारपूर-बामणीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनींना परिक्षेच्या शेवटच्या दिवशी मंडळातर्फे निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री.पी.यु.जरिले, सचिव श्री.आर.एन.खाडे, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर, कोषाध्यक्ष श्री. व्ही.ए. साळवे, माजी नगराध्यक्षा डॉ. श्रीमती रजनीताई हजारे, प्रा.एल.के.बलकी, प्राचार्य अनुप कुटेमाटे ,  संचालक श्री. मनोहर माडेकर, श्री.गजानन घुगुल, श्री.युगराज बोबडे, श्री किसनराव पोडे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले. दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या आयुष्यातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतीगृहातील वॉर्डन श्रीमती शारदा बोबाटे, श्रीमती रेवता जीवतोडे, श्रीमती गिता काकडे व मंडळाचे व्यवस्थापक श्री सुमित कौरासे यांनी मेहनत घेतली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page