Wednesday, June 3, 2026
HomeParbhaniमानवी जीवनाला गुरुमुळे सद्गती मिळते. ......ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे...
spot_img

मानवी जीवनाला गुरुमुळे सद्गती मिळते. ……ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे माऊली ).

मानवी जीवनाला गुरुमुळे सद्गती मिळते. ……ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे माऊली ).

जनतेच्या महासागराच्या साक्षीने फिरता ज्ञानेश्वरी सांगता पारायणाची सेलूत सांगता.

माऊली च्या कृपेने वरूण राजा सुद्धा थांबला.

ज्योत्स्ना वानखेडे: मृत्यू लोकांमध्ये तीन प्रकारचे जीवन असतात . यात मतीत प्रधान जीवन ,गतीत प्रधान जीवन ,व विभूती प्रधान जीवन. विभूती प्रधान जीवन हे देव देवतांचे असते. मतीत प्रधान जीवन हे साधू संतांचे असते .तर गतीत प्रधान जीवन हे मानवांचे असते. गतीत प्रधान जीवन म्हणजे राहणीमानात ,खान पानात ,वेशभूषेत व प्रवासात गती असणे. गतीत प्रधान जीवनामध्ये गतीचे दोन प्रकार आहेत .एक सद्गती व दुसरे फजिती .मानवाने घेतलेली गती त्याला या दोन ठिकाणी घेऊन जाते. उत्तम व्यवहाराने धन कमावून ते योग्य ठिकाणी खर्च करणारांना,  तसेच ज्ञान कमावनारांना आणि गुरुकृपा असणाऱ्यांना सद्गती मिळते. म्हणजेच मानवी जीवनात गुरूमुळे सद्गती मिळते, असे प्रतिपादन ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांनी आशीर्वाचन पर बोलताना केले आहे.शहरातीलअलंकापुरी नगरीतील फिरता ज्ञानेश्वरी सांगता सोहळ्यातील काल्याच्या कीर्तनात ते गुरुवार 19 मार्च रोजी भाविकांशी संवाद साधत होते .

बहुतांंचे संगती ,

बहु पावलों फजिती .

बरें केलें नंदबाळें,

 मागिलांचे तोंड काळें,

 माझा करितील तंटा ,

लपती आलिया बोभाटा .

तुका म्हणी काई ,

किती म्हनों बाप आई.

श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी ,गोपाळा ंचा आणि भगवंताचा संवाद साधताना घेतलेल्या अभंगाचे सविस्तर विवेचन करताना ह भ प कदम माऊली म्हणाले की, ज्याप्रमाणे मानवी जीवनात सद्गती प्राप्त होण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे. अगदी त्याचप्रमाणे चांगल्या मार्गाने कमावलेले धन व ते चांगल्या मार्गासाठी खर्च करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे .तसेच सद्गती प्राप्त होण्यासाठी मानवाकडे ज्ञान असणे देखील गरजेचे आहे. त्या उलट मानवी जीवनात फजिती होण्याचे देखील तीन कारणे आहेत. ते असे, बायको ,मिथ्याचार आणि नको त्याची संगत. मानवाला मानवी जीवनात फजितीला कारण त्याची पत्नी देखील असू शकते . कारण पत्नी चांगली मिळाली तर जीवनात सुख मिळते नाही तर फजिती होते .मानवी जीवनात मिथ्याचार म्हणजेच खोटे बोलले तर फजिती होते .अगदी त्याचप्रमाणे नको त्याची संगती केली तरी देखील मानवी जीवनात फजिती होते. त्यामुळे गोपाळ भगवंताला म्हणतात की फजिती होणाऱ्यांची संगत यापुढे आम्हाला नको. त्यांना सोडून आम्ही भगवंताशी एकरूप होऊ, म्हणून सामान्य मानवाने देखील नको त्याची संगत करण्यापेक्षा, भगवंताची संगत करावी .दररोज ज्ञानोबा तुकाराम यांच्या नावाने नाम जप करावा .ज्ञानेश्वरी व गाथा यांची पारायण करावी. प्रत्येकाने आपल्या गावात ज्ञानोबा तुकाराम यांच्या नावाने एक तरी झाड लावावे .कोणीही कोणाच्या जातीचा विचार करू नये. प्रत्येकाची जात वारकरी संप्रदाय हीच आहे ,असे समजून संत सानिध्यात यावे ,असे आवाहन ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांनी केले आहे .

अलौकिक उत्सव

मागील आठ दिवसापासून शहरातील अलंकापुरी पुरी नगरीतील फिरता ज्ञानेश्वरी सांगता सोहळा, उत्सव अलौकिक संपन्न झाला आहे.  ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सेवन करण्यास मिळाले. अगदी त्याचप्रमाणे विविध महाराष्ट्रीयन संस्कृतीचे अगदी ग्रामीण भागातून आलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करायला मिळाले .सातशे पन्नास पदार्थांचा आग्रह यासाठी होता की ,आपण आपले मूळ महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ पूर्णपणे विसरून गेलो आहोत .आपण बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ लागलो आहोत. आपल्या पदार्थांची जाणीव होऊन चव चाखायला मिळावी ,म्हणून 750 पदार्थांचा आग्रह धरला होता. आणि ग्रामीण भागातील दानशूर भाविकांच्या मदतीने तो पूर्ण झाला आहे.असे म्हणतात की ,जगात जर्मनी व भारतात परभणी याला अनुसरून, आदरणीय पंडित महाराज डाके यांनी ही ज्ञानोबारायांची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली .मागील दोन वर्षापासून फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा अविरतपणे सुरू आहे. याची सांगता सेलू शहरात दिव्य स्वरूपात पूर्ण झाली आहे. यासाठी सगळे कीर्तनकार, गायक ,वादक ,अठराकट जातीत जन्मलेले ,अखंड हिंदू समाज एकत्र एकत्र आले .तसेच पाराण्याचे आकर्षण म्हणजे ,प्लॅस्टिक , पाकीट व पावती मुक्त पारायण करण्यात आले.  संपूर्ण सोहळ्याला कोणी मालक नव्हते. सोहळ्याचा मालक एकच होता .तो म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय ,त्यामुळे सोहळ्यात सेवा व योगदान देणारे ,मंडप, केळीची पाने ,गावागावातून आलेले पक्वान्न ,दीप प्रज्वलन करून दिपोत्सव साजरा करणारे महिला व पुरुष ,आठ दिवस निरपेक्ष भावाने सेवा देणारे कीर्तनकार, ऐकणारे श्रोते ,वादक ,गायक ,पोलीस प्रशासन, विद्युत प्रशासन, पत्रकार मंडळी ,महसूल विभागातील कर्मचारी, नगरपालिका ,स्क्रीन मालक व सौजन्यदाते , फुलं व फुलांची सेवा देणारे , अलंकापुरी नगरी साठी जागा उपलब्ध करून देणारे, शूटिंग करणारे, संपूर्ण सोहळ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी व इतर पाणी पुरवणारे, परिसराची स्वच्छता करणारे, अतिशय अल्प दरात भाविकांची ने आण करणारे ऑटो चालक, गटकळ अकॅडमी चे विद्यार्थी, चहा ची सेवा देणारे ,भांडे घासणारे , स्टीलची वाटी व ग्लास देणारे ,संत पूजनाची सेवा देणारे , दररोजचे अन्नदाते, विशेष म्हणजे , सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक पंडित महाराज डाके ,यांच्याकडे सोहळ्यातील उर्वरित देणे मागण्यासाठी कोणीही जाऊ नये ,त्याऐवजी सोहळ्यातील उर्वरित देणे उद्योजक जयप्रकाश बिहाणीजी व ठेकेदार रामप्रसादजी घोडके हे  दोघेजण मिळून चुकती करणार असल्याचे कदम महाराज तथा छोटे माऊली यांनी जाहीर करून या सर्वांचेच धन्यवाद मानले.बुधवार 11 मार्च पासून  सोहळ्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ झाला .

वरुणराजाची कृपा तो माऊली च्या कृपेने क्षण भर येऊन भेट देऊन गेला.11 मार्च रोजी शोभायात्रा व ग्रंथ दिंडीने फिरता ज्ञानेश्वरी सांगता सोहळ्याची व्यापकता सेलूकर यांच्या लक्षात आणून दिली. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी, भाविकांची मोठी उपस्थिती होती .अगदी पहिल्या दिवशीपासून उपस्थितीमध्ये दररोज भाविकांची वाढच होत होती. सोहळा परिपूर्ण नियोजनासह दररोज रंग रूपात येत होता. सोहळा सांगते कडे आला ,आणि असे वाटू लागले की , या अभूतपूर्व सोहळ्याला नजर लागते की ,काय ? कारण गुरुवार 19 मार्च रोजी ,नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडवा असताना देखील, उपस्थित भाविकांची संख्या दीडीने वाढली . सोहळ्याची सांगता ,काल्याचे किर्तन व महाप्रसादाच्या नियोजनासाठी ग्रामीण भागातील अन्नदाते ट्रक व टेम्पो द्वारे पक्वान अलंकापुरी नगरीत घेऊन येणार ,इतक्यात  दबक्या पावलाने वरूण राजाने अलंकापुरी नगरीत येऊ पाहत होता पण माऊली ची कृपा झाली आणि क्षण भर येऊन भेट देऊन थांबला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page