Saturday, September 12, 2026
spot_img
HomeParbhaniसंकटात देशासाठी धावून जातो तोच खरा नागरिक- स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

संकटात देशासाठी धावून जातो तोच खरा नागरिक- स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

संकटात देशासाठी धावून जातो तोच खरा नागरिक- स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

चौथ्या दिवशीही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

ज्योत्स्ना वानखेडे: – देश टिकला तरच धर्म टिकतो. संस्कृती टिकते. देशाच भवितव्य आपल्या हाती असते. राष्ट्राच्या कल्याणा करिता आपण जागृत राहाणे गरजेचे असते. जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा राष्ट्र हिता साठी जो धावून जातो तोच खरा नागरिक असतो. हाच संदेश महाभारत कथेतून मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. अलंकापुरी नगरीत सुरू असलेल्या फिरता ज्ञानेश्वरी सांगता पारायण सोहळ्यात महाभारत संदेश कथेचे चौथे पुष्प रविवार ( दि.१५) रोजी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी गुंफले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ” फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात सेलूकरांच्या हातून वैष्णवांची सेवा घडते आहे. ही वैष्णव सेवा पांडूरंग चरणी रूजू होते आहे. पांडूरंग सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. माणसांना सावरण्या चे, मनोबल वाढवण्याचे सामर्थ्य आपल्या पुराणात, संत वाङमयात, महाभारत कथेत आहे. त्यामुळे कधीच मन दुर्बल होऊ देऊ नये. घराच, आपल महत्त्व‌ टिकवायचे असेल, खरा विकास करायचा असेल तर वडिलधाऱ्यांना मान द्यायला हवा. माणसांचे नैतिक अधः पतन हे त्याच्या व कुटुंबाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरते. याची जाणीव महाभारत कथा देते. म्हणून कधीही नैतिकतेचीकास सोडू नये. ” असेही ते म्हणाले. चौथ्या दिवशीही फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रामप्रसादजी घोडके, सतीश झंवर, शिवनारायण बाहेती, नंदकिशोर बाहेती परिवारातर्फे स्वामीजींचे पूजन करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page