Wednesday, April 15, 2026
HomeNagpurखाजगी शाळा शिक्षक संघाचे,आज विभागीय अधिवेशन !
spot_img

खाजगी शाळा शिक्षक संघाचे,आज विभागीय अधिवेशन !

खाजगी शाळा शिक्षक संघाचे,आज विभागीय अधिवेशन !

ज्योत्स्ना वानखेडे:
 खाजगी शाळा शिक्षक संघाचे, रविवार दिनांक २२ मार्च ला विभागीय अधिवेशन अध्यापक भवन, गणेश पेठ,बस स्थानकांसमोर आयोजित करण्यात येत आहे.
         यात नवीन पेन्शन स्कीम पर्याय निवडी बाबत ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत आहे OPS निवृत्तीवेतन 1982,  NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली,  RNPS सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व  UPS एकीकृत निवृत्तीवेतन योजना या पैकी आपणास OPS निवृत्तीवेतन 1982 सोडुन एकाची निवड करावी लागेल ही करतांना आपला आपल्या कुटूंबाचा व आपल्या पुढील आकांशा याचा विचार करूनच विकल्प द्यावा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
    टी.ई.टी.संदर्भातील मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रातील दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळेतील शिक्षकांना लागू करण्यात येऊ नये याबाबत स्थिती, वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करणे, संच मान्यता 15 मार्च 2024 चा आदेश रद्द करणे,जुन्या RTE निकषानुसार संचमान्यता कायम करणे,विनाअनुदानित पात्र शाळांना अनुदान देणे व पुढील टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येईल.
अध्यक्ष : मा.श्री. प्रमोद रेवतकर  (अध्यक्ष, खाजगी शाळा शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य)
कार्यक्रमाचे उदघाटक : मा.श्री. प्रमोद काळबांडे (संपादक, दैनिक सकाळ, नागपूर )
विशेष अतिथी :मा.श्री. विकासभाऊ ठाकरे (आमदार,पश्चिम नागपूर), मा.श्री. अशोक दगडे (अध्यक्ष मध्यवर्ती कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य)
प्रमुख अतिथी: मा.सौ.स्नेहल ज्ञानेश्वर ठाकरे (नगरसेविका, म.न.पा. नागपूर) मा. श्रीमती किरण चीनकुरे (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, नागपूर)
या कार्यक्रमाला शिक्षक बंधु भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे सर्वश्री ज्ञानेश्वर वाघ (विभागीय अध्यक्ष), तेजराम बांगडकर (केंद्रीय उपाध्यक्ष) गोपाल मुर्‍हेकर (कोषाध्यक्ष) प्रमोद कुंभारे (अध्यक्ष नागपूर जिल्हा)  विजय आगरकर (सचिव, नागपूर जिल्हा) मोरेश्वर मौदेकर (अध्यक्ष, नागपूर शहर) पवन नेटे(सचिव, नागपूर शहर) लतेश कोरडे सदस्य अतुल भुरे (सदस्य )श्रीमती दिपीका सोरते-हेडाऊ (सदस्या) व खाजगी शाळा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page