Sunday, May 31, 2026
HomeFestivalsविचोडा ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता; श्रीरामनवमीदिनी शब्दपूर्तीचे समाधान – आ. श्री. सुधीर...
spot_img

विचोडा ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता; श्रीरामनवमीदिनी शब्दपूर्तीचे समाधान – आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

विचोडा ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता; श्रीरामनवमीदिनी शब्दपूर्तीचे समाधान – आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते रामनवमीच्या पावन मुहूर्तावर विचोडा येथे ‘श्रीराम महाप्रवेशद्वारा’चे भूमिपूजन

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून ५० लाखांच्या स्वागतगेट उभारणीला प्रारंभ

आ. मुनगंटीवार यांनी विचोडा ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण; श्रद्धा, विकास आणि संस्कृतीचा सुंदर संगम

Jyotsna Wankhede: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विचोडा ग्रामस्थांना दिलेला शब्द श्री रामनवमीच्या दिवशी पूर्ण करीत पुन्हा एकदा ‘दिला शब्द केला पूर्ण’  याची प्रचिती दिली. चंद्रपूर तालुक्यातील मौजा विचोडा (बू.) येथे ५० लाख रुपयांच्या भव्य ‘श्रीराम महाप्रवेशद्वार’व सुशोभीकरण बांधकामाचे भूमिपूजन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. श्रीरामनवमीच्या शुभदिनी ही शब्दपूर्ती होणे हा माझ्यासाठी विशेष समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे’, या शब्दांत आ. मुनगंटीवार यांनी यावेळी समाधानही व्यक्त केले.

यावेळी आ. मुनगंटीवार यांनी विचोडा येथील मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. स्वागतगीत, भजन आणि लेझीम पथकाच्या उत्स्फूर्त सादरीकरणातून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक रामानुजम, विभागीय वन अधिकारी पाठक, कार्यकारी अभियंता पगारे, ग्रामपंचायत विचोडा प्रशासक माधुरी सागोरे, आयोजक अनिल डोंगरे, नगरसेवक रवी लोणकर, विक्की लाडसे, शोभाताई पिदुरकर, रजनीताई ढुमणे, श्रीधर कुलमेथे, संगीताताई हेलवडे, प्रियंकाताई जाधव, उज्वलाताई नलगे, ग्रामपंचायत सदस्य, वन विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना आ.मुनगंटीवार यांनी सर्व विचोडावासियांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गावातील जनतेची अध्यात्मिक भावना, प्रभू श्रीराम व भगवान महादेवावरील भक्तिभाव आणि नामसंकीर्तनावरील प्रेम यांचा गौरव करत त्यांनी ‘श्रीराम महाप्रवेशद्वार’ हे गावाच्या श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी महादेव शिवलिंग प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या वेळी विचोडा ग्रामस्थांनी या प्रवेशद्वाराची मागणी केली होती. त्या वेळी दिलेला शब्द पाळत आज या ५० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. “मी नेहमीच रामभक्त व महादेव भक्तांच्या भावनांचा आदर करत त्यांच्या प्रत्येक मागणीच्या पाठीशी उभा राहिलो आहे,” असे सांगत त्यांनी या निर्णयामागील भावनिक बांधिलकी अधोरेखित केली.

या स्वागतगेटच्या बांधकामात दर्जा, आकर्षक चित्ररचना आणि समर्पक रंगसंगती यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, गावातील राम मंदिरासमोरील गेट भव्य व सुबक स्वरूपात उभारण्याचे निर्देश देण्यात आले. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरासाठी पाठविण्यात आलेल्या काष्ठाच्या धर्तीवरच या प्रवेशद्वाराची रचना करावी, असे त्यांनी नमूद केले.

आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, पालकमंत्री असताना मार्च २०२४ मध्ये मंजूर करण्यात आलेला विचोडा ते छोटा नागपूर हा ९०० मीटर रस्ता अपूर्ण राहिला होता. आता २० एप्रिल २०२६ पासून सुमारे ६ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.यावेळी त्यांनी मतदारसंघातील २३० भजन मंडळांना साहित्य वितरण केल्याचा उल्लेख करत “भजनातून माणसाच्या रक्ताच्या थेंबा-थेंबात चैतन्य निर्माण होते,” असे सांगितले.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्देश देताना त्यांनी सांगितले की, १६ एप्रिल रोजी पर्यावरणव मंत्री पंकजाताई मुंडे चंद्रपूर दौऱ्यावर येणार असून, त्या पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रदूषणाच्या घटनांची नोंद छायाचित्रणाद्वारे घ्यावी. तसेच, १ जुलैपासून जिल्हाभर वृक्ष लागवडीचे महाअभियान राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बांधांवर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे आवाहन केले. रामनवमीच्या शुभदिनी पार पडलेले हे भूमिपूजन विचोडा गावासाठी केवळ विकासाचा टप्पा नसून श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक ठरले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page