बल्लारपूर ओपनकास्ट माईन मधून माती गायब करण्याचा प्रकार, वेकोली अधिकाऱ्याचे मौन व्रत
बल्लारपूर ओपन कास्ट माईन मधून माती गायब करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून, फार मोठ्या प्रमाणात माती गायब केल्याचा समोर आला आहे. याच्यामध्ये वेकोलीचे अधिकारी व माती माफिया यांची स्पष्टपणे साठगाठ असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात माती यांच्या डोळ्यालगत दिशेनाशी होत असताना, हे मात्र झोपेचे सोंग करत असल्याची चर्चा सुरू आहे.
डम्पिंग यार्ड मधून माती गायब करून विशिष्ट ठिकाणी नेऊन टाकण्याचे चित्र कॅमेरात आले आहे. म्हणून अधिकारी कितीही काही सांगत असेल तर काय यामध्ये आमचा हात नाही. परंतु कॅमेरा मध्ये स्पष्टपणे सर्व कारभार भोंदू बाबा खरात सारखा दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.