Saturday, September 12, 2026
spot_img
Homeबल्लारपूरश्री मोठे हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव संपन्न

श्री मोठे हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव संपन्न

श्री मोठे हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : ०१ एप्रिल २०२६ रोजी टेकडी विभाग, महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथे श्री मोठे हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त नर्मदेश्वर शिवलिंग, श्री गणेश व श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच सभागृह उद्घाटन सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या मंगलमय प्रसंगी मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, नगर परिषद बल्लारपूर) तसेच
मा. श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा. डॉ. अल्का अनिल वाढई व मा. डॉ. अनिल सदाशिव वाढई यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
या पावन सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने कलश शोभायात्रेने करण्यात आली असून, या शोभायात्रेचे उद्घाटन सौ. अल्का अनिल वाढई यांच्या शुभहस्ते पार पडले. शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले.
सदर सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष श्री किशोर ना. मोहुर्ले, उपाध्यक्ष श्री भास्कर म. वडस्कर व श्री प्रदीप श. पवार तसेच सचिव श्री तानाजी बा. वैद्य व श्री राकेश शा. कन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page