Sunday, May 31, 2026
HomeChandrapurताडाळी एम आय डी सी येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रासाठी...
spot_img

ताडाळी एम आय डी सी येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रासाठी ५३. १५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

ताडाळी एम आय डी सी येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रासाठी ५३. १५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

 आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार, सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलीत

चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवे बळ

Jyotsna  Wankhede: चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ताडाळी एम आय डी सी येथील प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राच्या उभारणीला आता वेग मिळाला असून, महसूल व वन विभागाच्या दि. २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पांतर्गत चार महत्त्वाच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या कामांसाठी एकूण ५३. १५कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा काष्ठ प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात नवे स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.या निर्णयामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार आला असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, आ. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असतानाच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. वनमंत्री पदाच्या कार्यकाळात आ. सुधीर मुनगंटीवार यांनीच या प्रकल्पाला मान्यता दिली असून त्यांच्याच  हस्ते दि. 5 मार्च 2024  रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन देखील झाले होते.राज्यातील वनसंपत्तीचा शाश्वत व मूल्यवर्धित वापर व्हावा, तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी, या दूरदृष्टीतून त्यांनी फर्निचर क्लस्टरची गरज ओळखून हा विषय शासन पातळीवर सातत्याने पुढे नेला. आज त्याच संकल्पनेला मूर्त रूप मिळत असून, त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे हे ठोस फलित आहे.

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांमध्ये  मुख्य शेड-I (रु १४.७२ कोटी), कॅन्टीन ब्लॉक, स्किल डेव्हलपमेंट सेंटर व अंडरग्राउंड टँक (रु १३.१३ कोटी), केमिकल स्टोअर, मीटर रूम, गार्ड रूम, कंपाऊंड वॉल व अंतर्गत रस्ता (रु १०.८० कोटी) तसेच सीझनिंग शेड-२ व इलेक्ट्रिकल रूम (रु १४.५० कोटी) या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारणीचा समावेश आहे. सर्व कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूरचे मुख्य अभियंता यांची तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाचा मुद्दा अर्धा तास चर्चे दरम्यान प्रभावीपणे मांडत वनमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजुरीचे आश्वासन दिले होते. यापूर्वी देखील वनविभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी सातत्याने ही मागणी रेटून धरली होती. त्यांच्या या चिकाटीमुळेच शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
याचबरोबर, आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून नुकतेच बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व ‘झायलेरियम’ उभारण्यालाही गती मिळाली आहे, जे काष्ठसंपत्तीच्या अभ्यास, संवर्धन आणि जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा देखील केली आहे.
या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्हा केवळ औद्योगिकच नव्हे, तर शैक्षणिक आणि संशोधनाच्या दृष्टीनेही समृद्ध होणार आहे.काष्ठ प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण आणि वनाधारित अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. लाकडाचे मूल्यवर्धन, उच्च दर्जाचे फर्निचर उत्पादन, निर्यातक्षम उत्पादने आणि कौशल्याधारित रोजगार निर्मिती यासाठी हा उद्योग अत्यंत उपयुक्त आहे. एम आय डी सी ताडाळी येथे उभारण्यात येणारे हे अत्याधुनिक केंद्र स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगक्षम बनवेल, तसेच लघु व मध्यम उद्योगांना चालना देईल.
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. वनसंपत्तीचा शाश्वत वापर आणि पर्यावरणपूरक औद्योगिक विकास यांचा संगम साधणारा हा प्रकल्प विदर्भाच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच एमआयडीसी ताडाळी येथील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असून, येत्या काळात तो चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया ठरणार आहे

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page