Monday, April 20, 2026
HomeChandrapurआ. सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने फुटपाथ व्यावसायिक, ऑटो रिक्षा चालकांना कुलजार चे वितरण
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने फुटपाथ व्यावसायिक, ऑटो रिक्षा चालकांना कुलजार चे वितरण

तळपत्या उन्हात माणुसकीची सावली

आ. सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने फुटपाथ व्यावसायिक, ऑटो रिक्षा चालकांना कुलजार चे वितरण

Jyotsna Wankhede: एप्रिलच्या कडक उन्हाने जीव अक्षरशः हैराण झाला असताना, जीवाची काहीली होत असताना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या फूटपाथवरील छोटे विक्रेते, फळ विक्रेते, चर्मकार बांधव आणि रेल्वे स्टेशन परिसरातील ऑटो रिक्षा चालक यांच्यासमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला होता. दिवसभर उन्हात उभे राहून काम करणाऱ्या या घटकांची तहान केवळ पाण्याची नव्हे, तर कुणीतरी आपल्या वेदना समजून घेण्याची होती.

ही वेदना ओळखत मा. आ. सुधीर  मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून माता कन्यका सेवा संस्था यांच्या वतीने तात्काळ कुल जार कॅनचे वितरण करण्यात आले. जिथे गरज होती, तिथेच मदतीचा हात पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे अनेक कष्टकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.
या उपक्रमाची खरी जादू होती ती त्यामागील संवेदनशीलतेत… फूटपाथवर उन्हात उभा राहून फळ विकणारा विक्रेता असो, आपल्या हातगाडीवर संसार चालवणारा लहान व्यापारी असो, चर्मकार बांधव असोत किंवा प्रवाशांची वाट पाहत तासन्तास उभा राहणारा ऑटोचालक,प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाला ओळखून त्यांच्यापर्यंत मदतीचा गारवा पोहोचवण्यात आला.
“उन्हात काम करताना पाण्याची खूपच अडचण होत होती… आज सुधीरभाऊंच्या माध्यमातून मिळालेला हा दिलासा आमच्यासाठी खूप मोठा आहे,” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला समाधानाचा भाव आणि डोळ्यांतील कृतज्ञता हीच या कार्याची खरी पोचपावती ठरली.
आजच्या वेगवान आणि अनेकदा संवेदनाहीन होत चाललेल्या जगात, अशा प्रकारची तात्काळ आणि मनापासून केलेली मदत केवळ एक सेवा राहत नाही, तर ती विश्वासाची नवी नाळ जोडते.  आ. सुधीर  मुनगंटीवार यांच्या सजग आणि संवेदनशील नेतृत्वातून उभा राहिलेला हा उपक्रम म्हणजे केवळ पाण्याचे वितरण नव्हे… तर गरजूंना दिलासा देणारी, माणुसकीची जपणूक करणारी एक हृदयस्पर्शी कृती आहे.
तळपत्या उन्हात मिळालेला हा गारवा, या कष्टकरी घटकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page