सेलू परभणी रोडवर दुचाकी स्वाराचा मृत्यू.
मृत व्यक्ती डुगरा येथील रहिवासी.
ज्योत्स्ना वानखेडे: सेलू तालुक्यातील डुगरा येथून सेलू कडे येत असलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या हायवा ट्रकने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की,या दुचाकी वरील एक जण ट्रकच्या मागच्या टायर खाली गेल्याने जागेच मृत्यू झाला, तर एक किरकोळ जखमी झाला हा अपघात शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सेलू परभणी टी रोडवरील मदरसा जवळ घडला असून या अपघातात रखमाजी नामदेव थोरात वय 55 वर्ष रा. डुगरा तालुका सेलू येथील रहिवासी आहे तर बबन कचरूबा शिरसाट वय 49 वर्ष रा. कुपटा हे या अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे सपोनि कृष्णा घायवट पोउपनी शेख, सपोनि तेलंगे, पोलीस हवालदार शेख, पुलाते, कांगणे व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह आणि जखमी शिरसाट यांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणून लावण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपासणी करत आहे.