मोकाट कुत्र्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीस चावा.
सेलू शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट.प्रशासनाचे दुर्लक्ष.

ज्योत्स्ना वानखेडे: पाथरी,परभणी, जिंतूर या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालके, वृद्ध व्यक्ती अनेकदा गंभीर जखमी झाल्याच्या व नंतर त्यांचे मुत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना या घटनांचा विसर पडत नाही तोच सेलू शहरात दिनांक 16/04/2026 रोजी सकाळी मॉर्निंग वॉक साठी सेवानिवृत्त कर्मचारी शमशोदिन शेख यांच्या डाव्या हाताला मोकाट कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याची घटना शहरातील भोई गल्ली परिसरात घडली विशेष म्हणजे हे कुत्रे हातगाड्या वर बसतात व अचानक माणसाच्या अंगावर झेप घेऊन चावा घेत आहेत. या घटनेत शेख यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सेलू उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. शहरातील भोई गल्ली,सुरज मोहेल्ला(म्हसोबा चोक) जव्हेरी गल्ली,विद्या नगर व अन्य ठिकाणी देखील मोकाट कुत्र्यानी लहान बालकां सह जेष्ठ नागरिकांना चावा घेतल्याचे घटना घडल्या आहेत,परंतु नगर परिषद प्रशासनाने मात्र कुंभकर्णी झोपेत असून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष या मोकाट कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करणार का? असा सवाल शहरातील नागरिक विचारत आहे, सेवा निवृत्त शमशोदिन शेख सकाळी नहेमी प्रमाणे गुरूवारी सकाळी ते भोई गल्ली मधून घरी जात असताना मोकाट कुत्र्याने त्यांचे डाव्या हाताला चावा घेतला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे कुत्र्याने अक्षरशा त्यांच्या डाव्या हाताला पुर्ण तोंडा मध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही, नाही तर लचका तोडला असता. त्यामुळे डाव्या हातावर खोलवर जखम झाल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. या घटने नंतर शेख यांना तात्काळ सेलू उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते नगर परिषद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे, सेलू शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद स्पेशल कुचकामी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यां मुळे अन्य रोगराई पसरण्याची भिंती व्यक्त केली जात आहे त्या मुळे संपूर्ण शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा नायनाट नगर परिषदेने तात्काळ करावा अशी मागणी नागरिकां मधुन जोर धरताना दिसून येत आहे, या वर्षी 15 ते 20 जणांना रेबिज इंजेक्शन साठी नागरिक घाव घेताना दिसुन आले आहे या अगोदर सेलू परिसरातील सेवा निवृत्त शिक्षकेला देखील मोकाट कुत्र्यानी चावा घेतल्या मुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले होते या मुळे सर्वांना इंजेक्शन चा कोर्स पूर्ण करावा लागत असुन मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे शेख ने स्वतः नगर परिषद मध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अर्ज दिला होता.








