अर्जदाराने RTI अंतर्गत माहिती न मिळाल्याने आणि अवैध उत्खननाच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली
ज्योत्स्ना वानखेडे: अर्जदार नामे लक्ष्मण लिंगय्या कनकुंटला, राह. सुभाष वार्ड, बल्लारपूर, तह. बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांनी गैरअर्जदार :- 1. तहसिलदार, वणी, तह. वणी, जि. यवतमाळ , 2. नायब तहसिलदार, वणी, 3. रमेश राजूरकर, रा. मौजा मोहदा, तह. वणी, जि. यवतमाळ संदर्भ :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती नाही दिले बाबत माननीय जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना दाद मागितली आहे.
प्रकरण याप्रमाणे आहे की, मी मौजा बल्लारपूर येथील रहिवासी आहे. मी मौजा मोहदा, तह. वणी, जि. यवतमाळ येथील गट नंबर ९८ व गट नं ९०/१, ९०/२ हयामध्ये सन-२०१५ पासून गट क्र. ९ मध्ये हे.आर. ०.७३ मध्ये गैर अर्जदार नामे रमेश महादेवराव राजूरकर हे सदर जागेवर बिना परवाना गिट्टी काढणे सुरु आहे. बाजूला नाला आहे. नाला बंद करून त्या नाल्यावर अवैधरित्या खोदकाम उत्खनन सुरु आहे. तसेच आजू-बाजूला अवैधरित्या खोदकाम करून गिट्टी काढणे सुरु आहे. तसेच चु-यावर सुद्धा अवैध खोदकाम केले आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे आणि नालाबंद केल्यामुळे नाल्याचे वाहणारे पाणी हे पूर्णतः बंद झाले. त्यामुळे शेतिला व इतर आवश्यक कामाकरिता लागणारे/ मिळणारे पाणी बंद झाले आहे.
हया संदर्भात, मी माननीय सब डिविजनल ऑफिसर साहेब, वणी जि. यवतमाळ ह्यांना दि. १२.०१.२०२६ रोजी माहितीचे अधिकाराचे अंतर्गत माहिती मागितली हयांनी मा. नायब तहसिलदार साहेब, वणी ह्यांचे सदर प्रकरण पाठविले. पण ना. तहसीलदार साहेब, वणी ह्यांनी उत्तर दिले नाही. आणि प्रत्यक्षात भेट घेतली पण प्रकरणाचे उत्तर मिळाले नाही.
तसेच तहसीलदार साहेब, वणी ह्यास माहितीचे अधिकार मध्ये दि. १२.०१.२०२६ रोजी माहिती मागितली आणि प्रत्यक्षात भेट घेतली पण माहिती मिळाली नाही, उत्तर टाळा-टाळी देत होते.
मा. तहसीलदार, नायब तहसीलदार, वणी आणि गैरअर्जदार ह्यांचे वर योग्य कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. यासाठी अर्जदार, लक्ष्मण लिंगय्या कनकुंटला मो.नं. 9730251809 RTI (सामाजिक कार्यकर्ता) यांनी दिनांक :- ०६.०४.२०२६ रोजी अर्ज सादर केलेला आहे.