Tuesday, April 28, 2026
HomeParbhani“शाम ए सरगम” संगीतचा वर्धापनदिन साजरा.
spot_img

“शाम ए सरगम” संगीतचा वर्धापनदिन साजरा.

शाम ए सरगम” संगीतचा वर्धापनदिन साजरा.

ज्योत्स्ना वानखेडे: दि 26 सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी त्यांचा वर्धापन दिन श्री वेदव्यासांच्या तपश्चर्येने पावन पुण्यभूमीत श्री क्षेत्र बासर येथे ज्ञान बुद्धी विद्या,संगीत, कलेची आराध्य देवता श्री ज्ञानसरस्वती देवी मातेच्या चरणी भक्ती गीताने संगीत सेवा समर्पित करुन यशस्वीरीत्या भक्तीमय वातावरणात संपन्न केला.याप्रसंगी सहभागी कलाकार संचालक  शामसुंदर आढे यांनी श्री गणेश स्तवनाने व सरस्वती मंत्र सह, सरस्वती स्तवनाने सकाळी 11-20 वा. कार्यक्रमाची सुरुवात केली. देवी गोंधळ या गीताने सेवा समर्पित केली.मोहनराव कुलकर्णी यांनी देवी ची भक्तीगीते व श्री कृष्ण सुदामा भेटीचा वृत्तांत आपल्या गीता तून अतिशय उत्तम सादरीकरण करीत सेवा सादर केली तर सौ. विजया चौधरी यांनी सरस्वती स्तवन “सरस्वती च्या पदी रमते’ सह माय भवानी तुझे लेकरु, देह शुद्ध करुनी भजन करावे ने सादर करीत सेवा समर्पित केली.अशोक वानरे यांनी हे स्वर की देवी सरस्वती, आईवडिलांची थोरवी, झीनी झीनी रे गुलाल मंदिरमें अशा भक्तीगीतांनी सेवा समर्पित केली. दु. का.कुलकर्णी यांनी जय मां शारदे, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, आकाशी झेप घेरे, गीता ने सेवा समर्पित केली. विनोद मोगल यांनी, देहाची तिजोरी, शोधीसी मानवा या गीतांनी सेवा समर्पित केली.

आणि श्री पंकज लांडगे यांनी मेरे चौखटपे राम, साईनाथ तेरे हजारों हाध, विठू माऊली तू या गीतांमधून सेवा अर्पण केली.

कार्यक्रमाचे संचलनातून अशोक वानरे यांनी त्यांच्या शैलीत भक्तीमय वातावरण निर्माण केले. सर्व गायक कलाकारां सोबत सत्त्येंद्र चौधरी आणि सौ. विजया आढे यांनी पण दर्शनासह कार्यक्रमाचा आनंद घेतला.मंदिर संस्थान तर्फे पुजारी हरिष महाराज बासरकर यांनी सरस्वती मातेच्या गळ्यातील हार कृपाशिर्वाद प्रसादरुपी सर्वांना घालून व प्रसाद दिला. आणि महिलांना खण, नारळ, बांगड्या, कुंकू ओटी भरुन प्रसाद देऊन जणू श्री ज्ञानसरस्वती मातेने यशस्वीतेची पावती च दिली.

शेवटी मंदिर प्रशासनाचे आभार मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page