Thursday, August 6, 2026
spot_img
HomeJayantiदत्त मंदिरात लक्ष्मी नृसिंह जयंती साजरी

दत्त मंदिरात लक्ष्मी नृसिंह जयंती साजरी

दत्त मंदिरात लक्ष्मी नृसिंह जयंती साजरी

भजन स्पर्धा आणि नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार

ज्योत्स्ना वानखेडे: झाकीर हुसेन वॉर्ड स्थित दत्त मंदिरात लक्ष्मी नृसिंह जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने  भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात बल्लारपूर शहर आणि ग्रामीण भागातील भजन गटांनी सहभाग घेतला.
बक्षीस वितरण व सत्कार समारंभाला माजी खासदार आणि कामगार नेते नरेश बाबू पुगलिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भजन गटांना पारितोषिक वितरणानंतर नरेश बाबू पुगलिया यांचा हस्ते नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई,माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, लखन सिंह चंदेल,माजी नगरसेविका रेणूका दूधे, नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. सुनील कुलदीवार, सिक्की यादव, अब्दुल करीम शेख, मेघा भाले, मोना धानोरकर, सुनीता जीवतोडे यांचा शाल, नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रणय काकडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक गुप्ता, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, सचिव मारुती मोंडे,, सहसचिव शिवचंद द्विवेदी यांच्यासह मंदिर समितीचे इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page