Friday, August 7, 2026
spot_img
HomePoliceदहशत माजविण्याचा प्रयत्न; धारदार शस्त्रांसह दोघे बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात

दहशत माजविण्याचा प्रयत्न; धारदार शस्त्रांसह दोघे बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात

दहशत माजविण्याचा प्रयत्न; धारदार शस्त्रांसह दोघे बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात

ज्योत्स्ना वानखेडे: शहरातील कॉलरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत तलवार व कोयता जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई ३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
         मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, सरदार पटेल वॉर्ड परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. बल्लारपूर येथील कॉलरी ग्राउंड परिसरात पोलिसांनी छापा टाकला असता, दोन इसम हातात शस्त्रे घेऊन उभे असल्याचे दिसून आले.
       पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. हिरा सोनीलाल बहुरीया (वय ४४), रा. श्रीराम वॉर्ड बल्लारपूर आणि रामजित मंगल राजभर (वय ५२), रा. सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.
       आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये सुमारे ८२.५ सें.मी. लांबीची लोखंडी तलवार आणि ५६ सें.मी. लांबीचा लाकडी मुठ असलेला कोयता यांचा समावेश आहे. दोन्ही शस्त्रे जुनी व वापरात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
        या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
      सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोउपनि अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, नापोअं सचिन अल्लेवार तसेच पोलीस अंमलदार लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, मिलिंद आत्राम, शरद कारूष व मपोअं अनिता नायडू यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page