Monday, May 18, 2026
HomeChandrapur"गो ग्रीन टुगेदर" उपक्रम प्रभावीपणे राबवा - पूलकित सिह थेंब थेंब इंधनाचा...
spot_img

“गो ग्रीन टुगेदर” उपक्रम प्रभावीपणे राबवा – पूलकित सिह थेंब थेंब इंधनाचा वाचवा, स्वावलंबी भारत घडवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कर्मचारी अधिका-यांनी घेतली शपथ

“गो ग्रीन टुगेदर” उपक्रम प्रभावीपणे राबवा – पूलकित सिह थेंब थेंब इंधनाचा वाचवा, स्वावलंबी भारत घडवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कर्मचारी अधिका-यांनी घेतली शपथ

Jyotsna Wankhede : दिनांक १५ मे २०२६ रोजी पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने “गो ग्रीन टुगेदर” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी  पूलकित सिह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नूकतेच देण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार ऊर्जा बचत, संसाधन संवर्धन व पर्यावरण संरक्षण या उद्देशाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक, कार-पूलिंग, सायकल तसेच विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच क्षेत्रभेटी व कार्यालयीन दौरे एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.

कार्यालयीन कामकाजात नैसर्गिक प्रकाशाचा वापर, अनावश्यक वीज वापर टाळणे, वातानुकूलित यंत्रणा व इतर उपकरणांचा मर्यादित वापर करणे, तसेच बैठका व प्रशिक्षण कार्यक्रम शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, थेंब थेंब इंधनाचा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिह यांच्या हस्ते जिल्हा परिषद चंद्रपूर  मध्ये स्वावलंबी भारत घडविण्याची शपथ सर्व कर्मचारी यांना देण्यात आली. स्वावलंबी भारत घडवण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक प्रवास पद्धती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना “हरित योगदान प्रणाली”द्वारे प्रोत्साहन देण्यात येणार असून ,यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी व चारचकी वाहन वापरावर भर देण्यात आला आहे. एकट्या व्यक्तीने पेट्रोल दुचाकी वापरल्यास सदर व्यक्तीला प्रतीदिन प्रती प्रवेश  म्हणुन रु. 20/- योगदान तर चारचाकी वाहण वापरल्यास सदर व्यक्तीला प्रतीदिन प्रती प्रवेश  म्हणुन रु. 200/- योगदान द्यायचे आहे. जमा होणारी रक्कम “जिल्हा परिषद चंद्रपूर हरित स्वावलंबन कोष” मध्ये जमा करण्यात येईल. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणपूरक व जबाबदार प्रशासकीय कार्यसंस्कृती निर्माण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिह यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page