Saturday, May 30, 2026
HomeJanjagrutiराष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन अभियानाचा ५ जून 2026 रोजी शुभारंभ
spot_img

राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन अभियानाचा ५ जून 2026 रोजी शुभारंभ

राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन अभियानाचा ५ जून 2026 रोजी शुभारंभ

Jyotsna Wankhede: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीच्या माध्यमातून “राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन अभियान” अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन, दिनांक ५ जून रोजी होणाऱ्या भव्य शुभारंभ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.
ही बैठक आदरणीय तुषारजी देव पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीचे प्रमुख अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या विशेष उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी सर्व धर्मीय व सर्व संप्रदायांचे धर्मगुरू आदरणीय मनीषजी महाराज, मौलाना माजिदजी, सुनील पास्टरजी, ग्यानी जसबीरसिंगजी तसेच भंते प्रबुद्धजी यांची विशेष उपस्थिती लाभली.
बैठकीमध्ये पर्यावरण संवर्धन, पुनर्वसन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला “हरित जिल्हा” बनविण्याचा संकल्प करण्यात आला.
या अभियानामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, आरुषी फाउंडेशन, इंडियन डेंटल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, इको प्रो संस्था, चंद्रपूर स्त्रीरोग तथा प्रसूती रोग विशेषज्ञ संघटना, स्नेहांकित संस्था, टाटा कॅन्सर फाउंडेशन, इको टुरिझम बोर्ड, भारतीय मजदूर संघ, नवसंजीवनी पर्यावरण संरक्षण संस्था, किसान मोर्चा, मृगधारा संस्था, गुरुदेव सेवा मंडळ आणि वाघोबा बहुउद्देशीय संस्था आदी विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
बैठकीत सविस्तर विचारमंथन करून अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्याचे निश्चित करण्यात आले.
पहिला टप्पा – संशोधन व नियोजन :
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ओपन स्पेसचा शोध घेऊन वृक्षारोपणासाठी योग्य जागांची निवड करणे, कोणत्या प्रकारची झाडे कुठे व कशा पद्धतीने लावावीत याचे नियोजन करणे तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग निश्चित करणे.
दुसरा टप्पा – जनजागृती अभियान :
संपूर्ण जून महिन्यात विविध सामाजिक संस्था, मान्यवर आणि सर्व धर्मगुरूंच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती करणे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्लास्टिक निर्मूलन अभियान प्रभावीपणे राबविणे.
तिसरा टप्पा – ॲक्शन प्लॅन :
पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवून प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धनाची अंमलबजावणी करणे.
या अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक एकात्मता आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमध्ये वसंतराव थोटे, प्रा सुरेश चोपणे, डॉ कल्पना गुलवाडे, डॉ राजेश इंगोले, दिवाकर थोटे, निलेश काळे, नरेंद्र बोबडे, संजय दाणेकर, नितीन बनसोड, डॉ. संगीता पोटले, डॉ भारतीय दुधानी, पवन ढवळे,डॉ. पंकज कावळे,डॉ प्रसाद पोटदुखे, मनीष मुंदडा, डॉ ऋजुता मुंदडा, डॉ मोनिका कोतपल्लीवार, राजीव कक्कड, राजवीर यादव,अश्विनी खोब्रागडे
रवी लोणकर, सविता सरकार, सुनीता जयस्वाल, रवी चहारे, बंडू गौरकार, डॉ संजय बेले, अपर्णा चिडे, डॉ सुधीर गौरशेट्टीवार, रंजना मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page