Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeChandrapurमहसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे आ....

महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आढावा बैठक

महसूल विभागाशी संबंधित समस्या, अडचणी व सूचना व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन


Jyotsna Wankhede : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. विकासजी खारगे यांची १९ जून रोजी चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न, धोरणात्मक अडचणी, प्रलंबित प्रकरणे तसेच नागरिकांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे होणाऱ्या या बैठकीत महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार असल्याने नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना व धोरणात्मक बाबी स्वीय सहायक श्री. संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या आणि सूचना शासनाच्या वरिष्ठ स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून, प्राप्त होणाऱ्या सूचना व महत्त्वाचे प्रश्न अपर मुख्य सचिवांच्या बैठकीत मांडले जाणार आहेत. त्यावर आवश्यक ती कार्यवाही आणि प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित आपल्या समस्या, प्रलंबित प्रकरणे तसेच विधायक सूचना वेळेत पाठवाव्यात, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page