*ज्योत्स्ना वानखेडे*
1. *प्रकरण:*
दुय्यम निबंधक, मुद्रांक नोंदणी विभाग, कार्यालय चंद्रपूर येथील *श्री. मोहन चंद्रकांत शेट्टीवार, दुय्यम निबंधक श्रेणी-१* यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी प्रत्येक रजिस्ट्रीवर ₹२,०००/- प्रमाणे एकूण ₹४,०००/- ची लाच मागितली. ही रक्कम त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारल्याने दिनांक: १६/०६/२०२६ रोजी ACB चंद्रपूरने कारवाई केली.
2. *तक्रार कशी झाली:*
तक्रारदाराने भद्रावती तालुक्यातील मालमत्तेची नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली असता, आरोपी शेट्टीवार यांनी ऑपरेटरमार्फत ₹४,०००/- लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दिनांक: १६/०६/२०२६ रोजी ACB कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार दिली.
3. *सापळा कारवाई:* दिनांक: १६/०६/२०२६ रोजी ACB ने पंचांसमक्ष सापळा लावला. आरोपीने दस्तऐवजाची नोंदणी करून दिल्याचा मोबदला म्हणून ₹४,०००/- ऑपरेटरमार्फत स्वीकारले. पुढील तपास सुरू आहे.
4. *कारवाई करणारे अधिकारी:*
डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक; श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात; श्री. अनिल जिटटावार, पोलीस उपअधीक्षक; श्री. सचिन धर्मेजवार, पोलीस निरीक्षक आणि ACB चंद्रपूरच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
5. *नागरिकांना आवाहन:*
जर कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने एखादा एजंट सरकारी काम करून देण्यासाठी कायदेशीर फीव्यतिरिक्त लाच मागत असेल, तर तात्काळ ACB चंद्रपूरशी संपर्क साधावा.
*संपर्क:*
– श्री. अनिल जिटटावार, पोलीस उपअधीक्षक: ९८२३२७०५८१
– श्री. सचिन धर्मेजवार, पोलीस निरीक्षक: ९६२३०५५६५५
– टोल फ्री: 1064 | फोन: 07172-250251 | मोबाईल: 8379951064