Tuesday, July 28, 2026
HomeParbhaniजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विज्ञान प्रशिक्षण वर्गास प्रतिसाद.
spot_img

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विज्ञान प्रशिक्षण वर्गास प्रतिसाद.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विज्ञान प्रशिक्षण वर्गास प्रतिसाद.

Jyotsna Wankhede: दि १३ परभणी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) परभणी,आणि IISER पुणे आणि iRISE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक विज्ञान शिक्षकांच्या ‘दुसऱ्या टप्पा’ प्रशिक्षण वर्गाला आज मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ५२ प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधत त्यांनी प्रशिक्षणाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रगत प्रयोगांचे सादरीकरण

या प्रशिक्षण वर्गात एकूण ५२ शिक्षकांना विज्ञानातील कठीण संकल्पना साध्या सोप्या प्रयोगांतून कशा शिकवाव्यात, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. मान्यवरांनी भेटी दरम्यान प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या ‘iRISE’ किट्सची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी विचारप्रवृत्त व्हावे यासाठी शिक्षकांनी कशा प्रकारे प्रयोग मांडावेत, याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मान्यवरांचे मार्गदर्शन भेटीप्रसंगी बोलताना मान्यवर प्रमुख अतिथी विज्ञानप्रेमी डॉ. रामेश्वर नाईक  म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील विज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी DIET आणि IISER पुणे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे या प्रशिक्षणामुळे वर्गांमधील शिक्षण अधिक कृतीशील आणि आनंददायी होईल.”

प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये:

• सहभाग: जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील विज्ञान शिक्षक.

• सहकार्य: भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) पुणे व iRISE टीम.

• उद्देश: विज्ञानातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि प्रयोगशाळा तंत्रांचा विकास.

उपस्थित मान्यवर

या प्रसंगी अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार , प्रमुख अतिथी विज्ञानप्रेमी डॉ. रामेश्वर नाईक  , विज्ञान विभाग प्रमुख तथा जेष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे , वरिष्ठ अधिव्याखता डॉ प्रल्हाद खुणे , आयसर (IISER) पुणेचे प्रतिनिधी आणि आयराईज (iRISE) चे तज्ज्ञ मार्गदर्शक  जाहेदा शेख, व अपर्णा दाते, सुलभक बालासाहेब उघडे , सुलभक कल्पना दलाल  उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डायटमधील प्राचार्य , विज्ञान विभागाचे विभागप्रमुख  व सर्व अधिकारी सहकारी  परिश्रम घेत आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page