Wednesday, August 19, 2026
spot_img
HomeChandrapurसमृद्धी महामार्गावरील भीषण अपघातातील मृत जीवने कुटुंबीयांच्या निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांची...

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातातील मृत जीवने कुटुंबीयांच्या निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातातील मृत जीवने कुटुंबीयांच्या निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट

*Jyotsna Wankhede*: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील जीवने कुटुंबातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जीवने कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन  कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

            यावेळी आमदार जोरगेवार यांनी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली. तसेच या दुःखद प्रसंगात कुटुंबीयांना धीर देत, अशा प्रकारची भरून न येणारी हानी कोणत्याही शब्दांत व्यक्त करता येत नाही. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.

 अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने बाबूपेठ परिसरासह संपूर्ण चंद्रपूर शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेने प्रत्येकाचे मन हेलावून गेले असून नागरिकांकडूनही जीवने कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page