Tuesday, July 7, 2026
HomeEducationराजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांच्या संशोधनाची लंडनमध्ये दखल;...
spot_img

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांच्या संशोधनाची लंडनमध्ये दखल; लंडन हेराल्डच्या विशेष आवृत्तीत वैदिक गणित आणि आधुनिक संशोधन कार्याचा गौरव

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांच्या संशोधनाची लंडनमध्ये दखल;

लंडन हेराल्डच्या विशेष आवृत्तीत वैदिक गणित आणि आधुनिक संशोधन कार्याचा गौरव

*Jyotsna Wankhede*: सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट ) चंद्रपूर राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील गणित विभाग येथे कार्यरत प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांच्या वैदिक गणित,  क्वांटम मॅथेमॅटिक्स, मेरू प्रस्तार आणि आधुनिक संशोधनातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System), वैदिक गणित आणि भारतीय सांस्कृतिक वारशाच्या वैज्ञानिक व शैक्षणिक पैलूंवर संशोधन करणाऱ्या डॉ. चल्लेवार यांचे कार्य देश-विदेशात चर्चेचा विषय ठरत आहे.
“Ancient Vedic Mathematics Beyond Time” या संकल्पनेवर आधारित त्यांच्या संशोधनात प्राचीन भारतीय गणितीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधण्याचा प्रयत्न आणि विश्लेषण विषयांवरील त्यांच्या अभ्यासाने गणित क्षेत्रात नवीन दृष्टिकोन निर्माण केला आहे.
प्रतिष्ठित London Herald च्या विशेष आवृत्तीत त्यांच्या संशोधन प्रवासावर मॅगेझीन कव्हर पेज आणि विशेष लेख प्रकाशित करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचे लंडनमध्ये कौतुक झाले आहे. London Herald विशेष आवृत्ती मासिकात मोजक्या भारतीयांची निवड झाली असून विविध क्षेत्रातील विशेषज्ञ यांचे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.
प्रा. डॉ. चल्लेलवार यांनी जवळपास १९ वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात योगदान दिले असून, संशोधक, प्राध्यापक, लेखक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना दिशा दिली आहे. त्यांच्या संशोधनावर लंडनमध्ये चर्चा झाली असून, भारतीय प्राचीन गणितीय परंपरेला आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन व संशोधन कार्य केले असून, देश-विदेशातील संशोधकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना गणित गुरु रत्न पुरस्कार २०२५, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रोफेशनल एक्सेलन्स अवॉर्ड यासह विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.
या आंतरराष्ट्रीय गौरवाबद्दल सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट)चे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. अनिल झेड चिताडे तसेच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page