जनता विद्यालय सिटी ब्रँच, बल्लारपूर येथे ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा!
*Jyotsna Wankhede*:
दिनांक: ५ सप्टेंबर २०२६, रोज शनिवार भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जनता विद्यालय सिटी ब्रँच, बल्लारपूर येथे ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मंचावरील प्रमुख उपस्थिती:
अध्यक्ष: आर. ए. गंधारे ( मुख्याध्यापिका)
प्रमुख अतिथी: पी. जे. गंगमवार (पर्यवेक्षिका),
डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते (पाळी प्रमुख), रागिनी कुडे (विद्यार्थी मुख्याध्यापिका), हर्षिता गेडाम (विद्यार्थी पर्यवेक्षिका)
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि घडामोडी:
दीप प्रज्वलन व माल्यार्पण : कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका आर. ए. गंधारे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन आणि माल्यार्पण करून करण्यात आली.
वाढदिवसाचा दुग्धशर्करा योग:
आज शाळेतील पाळी प्रमुख डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते यांचा वाढदिवस असल्याने शाळेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या सुवर्णमूर्तावर त्यांनी शाळेला ८ झाडे भेट दिली व शाळेच्या परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण:
विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषणे दिली, तसेच इयत्ता पाचवीतील कु. आराध्या या विद्यार्थिनीने सुंदर गाण्यावर आकर्षक नृत्य सादर केले.
मार्गदर्शन : पर्यवेक्षिका पी. जे. गंगमवार, डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका आर. ए. गंधारे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव: ‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून सर्व विद्यार्थी-शिक्षकांनी वर्गावर्गांत जाऊन प्रत्यक्ष अध्यापनाचा (शिकवण्याचा) आनंद व अनुभव घेतला.
सूत्रसंचालन व आभार :
संचालन: आर्या गेडाम (इयत्ता ८ वी)
आभार प्रदर्शन: सौरभ मरसकोल्हे (इयत्ता ९ वी)
नियोजन : या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, सर्व विद्यार्थी-शिक्षक आणि शिपाई बांधवांनी मिळून केले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक एम. एल. पानघाटे व डी. एल. कुबडे यांनी मार्गदर्शन केले.