Wednesday, July 15, 2026
HomeGondpipari*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई; दोन ट्रॅक्टर व...
spot_img

*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई; दोन ट्रॅक्टर व ट्रॉली, एक जेसीबी असा ₹30,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई; दोन ट्रॅक्टर व ट्रॉली, एक जेसीबी असा ₹30,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*
दिनांक *15/07/2026 रोजी रात्री 03:30 वा.* चे सुमारास गोपनीय बातमीदार यांच्याकडून गोपनीय माहिती मिळाली की, मौजा तारडा ते कुलथा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या संतोष देवाडे यांच्या शेतालगत असलेल्या खुल्या जागेत रेतीचा अवैधरित्या साठा करून ठेवला असून त्या ठिकाणाहून जेसीबीच्या साहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या रेती भरून वाहतूक करीत आहे.
अशा माहितीवरून सदर ठिकाणी पोलीस स्टॉप व पंचासह जाऊन रेड कारवाई केली असता सदर कारवाईमध्ये खालील मुद्देमाल मिळून आला:
1.  *विना नंबरची लाल रंगाची महिंद्रा सरपंच 475 DI* तसेच *विना नंबरची ट्रॉली* मध्ये 01 ब्रास रेती भरलेली.
    *किंमत:* रेती ₹10,000/- + ट्रॅक्टर व ट्रॉली ₹5,00,000/-
2.  *दुसरा ट्रॅक्टर लाल रंगाचा MASSEY FERGUSON 9500 विना नंबरची* व *ट्रॉली क्र. MH 34 L 9927* मध्ये 01 ब्रास रेती.
    *किंमत:* रेती ₹10,000/- + ट्रॅक्टर व ट्रॉली ₹5,00,000/-
3.  *ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्याकरिता वापरलेले जेसीबी मशीन एक पिवळ्या रंगाचे JCB 3DX PLUS विना नंबरची*
    *किंमत:* ₹20,00,000/-
असा *एकूण ₹30,20,000/- चा मुद्देमाल* रेतीची अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला.
*आरोपींची नावे:*
1.  *आशिक नरेश मडावी* – वय 19 वर्षे, रा. व्यंकटपूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
2.  *ट्रॅक्टर मालक रितेश देवेंद्र बट्टे* – वय 30 वर्षे, रा. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
3.  *ट्रॅक्टर चालक प्रज्ज्वल विश्वनाथ कोहपरे* – वय 19 वर्षे, रा. वढोली, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
4.  *ट्रॅक्टर मालक हेमंत बंडू निखाडे* – वय 28 वर्षे, रा. फुरडीहेटी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
5.  *जेसीबी चालक सचिन सुरेश चापले* – वय 22 वर्षे, रा. कवठी, ता. कवठाला, जि. आसिफाबाद (तेलंगणा)
6.  *जेसीबी मालक लोकेश देवेंद्र बट्टे* – वय 20 वर्षे, रा. गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
सदर 6 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध *कलम 303(2), 3(5) भा.न्या.सं.* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
*कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:*
सदरची कार्यवाही *श्री. आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, सा. चंद्रपूर*, *श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, सा. चंद्रपूर*, *श्री. सत्यजीत आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सा. मुल* यांच्या मार्गदर्शनात
*पोलीस स्टेशन गोंडपिपरी चे ठाणेदार श्री. रमेश हत्तीगोटे*, श्रेणी पो.उपनी वसंत कोसमशिले, चालक सहा.फौ. पुनेश्वर कुळमेथे, पोलीस अंमलदार प्रशांत नैताम, तिरूपती गोडसेलवार, अतुल तोडासे, सुनिल गव्हारे यांनी केली आहे.
2 attachment  •  Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page