बल्लारपुरात स्वाभिमान दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे फळवितरण
ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक: 10 मे 2026 ला वंचित बहुजन आघाडी , महिला आघाडी तसेच युवा आघाडी बल्लारपूर द्वारे श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे फळवितरण करून साजरा केला याप्रसंगी सर्व प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व प. पु. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व महापुरुषांच्या जयघोष करुन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या दिर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन करुन ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले व बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी कामना करत कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयघोष केला त्या नंतर वंचित बहुजन आघाडी, बल्लारपूर कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बेघर जनकल्याण सोसायटीचे सचिव मा. देवरामजी नंदेश्वर साहेब यांच्या हस्ते व उमेश जनार्दन कडू शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून आनंदात साजरा करण्यात आला प्रामुख्याने महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे, तालुकाध्यक्ष नम्रता साव, जेष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले, रत्नमाला निरांजने, सुप्रियाताई चंदनखेडे, संगीता साखरे,आशाताई भाले, रेखाताई मेश्राम,वनमालाताई भसारकर, वत्सला तेलंग, इंदुताई खरतड, संदिप ताकसांडे, प्रियंकेश शिंगाडे, धनंजय रिंगणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती शहर महासचिव गौतम रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे दिली.