Wednesday, October 28, 2026
spot_img
HomeGondpipari*नाकाबंदी दरम्यान चारचाकी वाहनातुन देशी-विदेशी दारुसह वाहन जप्त, एक आरोपी ताब्यात*

*नाकाबंदी दरम्यान चारचाकी वाहनातुन देशी-विदेशी दारुसह वाहन जप्त, एक आरोपी ताब्यात*

*नाकाबंदी दरम्यान चारचाकी वाहनातुन देशी-विदेशी दारुसह वाहन जप्त, एक आरोपी ताब्यात*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

*पो.स्टे /अप.क्र./कलम*

गडचिरोली – अप.क्र. ३६४/२०२६ कलम – ६५(अ) ९८(२), महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम

*घटनास्थळ/घटना ता.वेळ*

मौजा तारसा बस स्टॉप मुख्य डांबरी रोडवर ११ किमी पुर्व *घटना ता. वेळ :-* दि.०५/०९/२०२६ चे १८.४४ ते १९.३० वा.पर्यंत

*फिर्यादी व आरोपीतांचे नाव*

फिर्यादी सरकार तर्फे राजु दुर्गय्या पंचफुलीवार, पो.अं/३४ पोलीस स्टेशन गोंडपिपरी. आरोपी – संघर्ष शंभु रामटेके, वय २३ वर्ष, व्यवसाय चालक, रा.इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर

*माहिती कशी प्राप्त झाली*

गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरुन (नाकाबंदी दरम्यान)

*कारवाई मधील सक्रिय अधिकारी/कर्मचारी*

पोलीस स्टेशन गोंडपिपरी – सपोनि/ रमेश हत्तीगोटे, पो.हवा/२७६८ मुन्नेश्वर रात्रे, पो.अं/३०५ अतुल तोडासे, पो.अं/३४ राजु पंचफुलीवार पो.अं/११८८ निलेश तुमाने, पो.अं/२७८९ प्रविण कडुकर.

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री तसेच बेकायदेशीर दारु वाहतुकीस आळा बसावा याकरीता मा.श्री. आयुष नोपाणी सा., पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे सा. अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच मा. श्री. सत्यजीत आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांनी जिल्ह्यातील अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर रेड करुन प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

मा. वरिष्ठ अधिकारी यांचेकडुन सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडत असतांना दिनांक ०५/०९/२०२६ रोजी सायंकाळचे दरम्यान मा.ठाणेदार, गोंडपिपरी यांचे आदेशाने पोलीस पथक गोंडपिपरी ते आष्टी जाणारे रोडवर असलेले मौजा तारसा बस स्टॉप मुख्य रोडवर नाकाबंदी करीत असतांना पोलीस पथकास बातमीदाराकडुन मौजा गोंडपिपरी ते आष्टी रोडनी सिल्वर रंगाचे मारुती सुजुकी कंपनीची डिझायर कार क्रमांक एम.एच. ३४ बि.आर. २२४३ याद्वारे देशी व विदेशी दारुची विनापरवाना वाहतुक होत असल्याबाबत माहिती मिळाली.

प्राप्त माहितीच्या अनुषंगाने नाकाबंदी पथकातील वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली असता गोंडपिपरी रोडनी मारुती सुजुकी कंपनीची डिझायर कार क्रमांक एम.एच. ३४ बि.आर. २२४३ ही नाकाबंदी करीत असलेल्या ठिकाणी आली. सदर कारच्या चालकास हात दाखवुन थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी वाहन थांबविले. सदर कार चालकाला पोलीसांचा परिचय देवुन कारची कायदेशिररित्या तपासणी केली असता कारच्या मागील डिक्कीमध्ये

१) ११,२००/-रुपये- ९० मिली मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे २८० नग निपा, प्रती निप विक्री किंमत ४०/-रु प्रमाणे.

२) ८१००/- रुपये- ५०० मिली मापाचे हायवर्ड ५००० कंपनीचे प्रिमीयम स्ट्रॉग टिन बिअर एकुण ६० नग, प्रती बिअर विक्री किंमत १३५/-रु प्रमाणे.

३) ५०००००/-रु सदरची दारु वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली सिल्वर रंगाची मारुती सुजुकी कंपनीची डिझायर क्रमांक. एम.एच ३४ बि.आर. २२४३ असा एकुण ५,१९,३००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन ताब्यात घेवुन गुन्ह्यातील नमुद आरोपी नामे- संघर्ष शंभु रामटेके, वय २३ वर्ष, व्यवसाय चालक, रा.इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर यांचे विरुध्द वरील नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोंडपिपरी पोलीस पथकाच्या प्रभावी कारवाई मुळे अवैध दारुविक्री करणारे तसेच बेकायदेशीररित्या दारुची वाहतुक करणा-या लोकांचे धाबे दणाणले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page