*ब्रह्मपुरी पोलीस ठाणे चे गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एका आंतरजिल्हा टोळीतील सराईत विधीसंघर्ष बालकांना जेरबंद करून तिन गुन्हे उघडकीस केले.*
*ज्योत्स्ना वानखेडे*
दि. *15.07.2026* रोजी फिर्यादी नाव *विरल मुकेश हलवादीया* वय 32 वर्षे, व्यवसाय उपहारगृह, रा. पटेलनगर ब्रह्मपुरी, जि. चंद्रपुर यांनी दि. *14.07.2026* रोजीचे *22.00* वा. ते दि. *15.07.2026* चे *10.00* वा. चे सुमारास त्यांचे सावरकर चौक, ब्रह्मपुरी येथील स्विटमार्टचे दुकानाचे शटरचे लॉक तोडून दुकानाचे गल्यामध्ये ठेवलेले सहा ते सात हजार रुपये कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेले अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथे *गुन्हा रजिस्टर क्रमांक 566/2026 कलम 305 (अ), 331 (4) भा.न्या.सं.* अन्वये नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा दाखल होताच ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक *प्रमोद बानबले* सा. यांचे मार्गदर्शनात डि.बी.पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमालाचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत असता बातमीदाराचे खात्रीशीर खबरवरून सदर गुन्ह्यातील तिन विधीसंघर्ष बालक हे गडचिरोली येथील असल्याची माहिती वरून विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन त्यांची गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केले. त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले पैसे हे हस्तगत करण्यात आले.
सदर तिन्ही विधीसंघर्ष बालक यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता सदर विधीसंघर्ष बालक पैकी एकाने चंद्रपुर येथुन दोन दुचाकी हया चोरी केल्याचे सांगीतल्याने त्याचेकडुन
*01)* कि.अं. *₹40,000/-* रु एक जुनी वापरती निळ्या रंगाची मोपेड क्र. एम.एच. 34 सी.बी. 7225 जिचा इंजीन नंबर *AF212806463* व चेचीस क्रमांक *MB8DP12DEN8B72981* असा असलेली
*02)* कि.अं. *₹50,000/-* रु एक जुनी वापरती काळ्या रंगाची स्लेंडर प्रो कंपनीची मो.सा. क्र. एम.एच.31 डी.एन. 7912 जिचा इंजीन नं. *HA10EHB9A23997* व चेचीस क्रमांक *MBLHA10ADB9A18473* असा असलेली
हया चोरी केल्याचे सांगीतल्याने सदर दुचाकी हया जप्त करण्यात आल्या आहेत. अश्या प्रकारे ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील घर फोडीचे गुन्ह्यासोबत रामनगर पोलीस ठाणे येथील दोन दुचाकी गुन्हे हे उघडकीस आले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी सो., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी श्री. दिनकर ठोसरे सो, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले सो. यांचे मार्गर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथक चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे सो. पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ठ रंगारी, प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वजील पळसपगार, यांनी केली.