Friday, July 17, 2026
HomeSanghtana*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा नियोजन बैठक १८ जुलै रोजी; बेंगळुरू महाअधिवेशन व...
spot_img

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा नियोजन बैठक १८ जुलै रोजी; बेंगळुरू महाअधिवेशन व दिल्लीतील ठिय्या आंदोलन*

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा नियोजन बैठक १८ जुलै रोजी; बेंगळुरू महाअधिवेशन व दिल्लीतील ठिय्या आंदोलन*

*ज्योत्स्ना वानखेडे*:राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच संलग्न महिला महासंघ, कर्मचारी-अधिकारी महासंघ, युवा महासंघ, किसान महासंघ, वकील महासंघ आणि विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका, चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी बेंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या व्यापक नियोजनाचा आढावा घेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातून व शहरातून जास्तीत जास्त प्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन निश्चित करण्यात येणार आहे.
तसेच, देशातील २०२७ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ठिय्या आंदोलनाच्या तयारीबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा, संघटनात्मक बांधणी, जनजागृती मोहीम आणि जिल्हानिहाय सहभाग यावर विशेष भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका, शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महाअधिवेशन व ठिय्या आंदोलनाच्या तयारीचा अहवाल, सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संभाव्य संख्या, वाहतूक व्यवस्था, संपर्क नियोजन तसेच इतर आवश्यक माहिती घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन भाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली पार पडणार असून, संघटनेच्या आगामी आंदोलनांची दिशा आणि पुढील कृती आराखडा या बैठकीत निश्चित केला जाणार आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी संलग्न सर्व आघाड्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांनी वेळेचे काटेकोर पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी, असे आवाहन रामदास कामडी (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, चंद्रपूर), भावना बावनकर, मनस्वी गिरे, रवींद्र टोंगे, ॲड. दत्ता हजारे, मनीषा बोबडे, राहुल चौधरी, देवराव दिवसे आणि श्रीहरी सातपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page