Wednesday, July 29, 2026
HomeHealth & Fitness"प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय" — डॉ. मंगेश गुलवाडे
spot_img

“प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय” — डॉ. मंगेश गुलवाडे

“प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय” — डॉ. मंगेश गुलवाडे

इंडियन रेड क्रॉस सोसायटी व चंद्रपूर ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिर संपन्न

*Jyotsna Wankhede* : इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर शाखा आणि चंद्रपूर ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात चंद्रपूर जिल्हा ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सदस्य, त्यांचे कुटुंबीय, न्यायालयीन कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांसाठी भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिर उत्साहात संपन्न झाले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.

शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी कान नाक घसा रोग,स्त्री रोग, त्वचा रोग, दंतरोग, कॅन्सर रोग रक्तदाब, मधुमेह (रक्तातील साखर) बोन मॅरो डेन्सिटी किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट हिमोग्लोबिन टेस्ट पॅप स्मिअर टेस्ट आदी महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले की, “प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय आहे. अनेक गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे न दाखवता वाढत असतात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, व्यसनमुक्त जीवन आणि मानसिक तणावाचे योग्य व्यवस्थापन हे निरोगी आयुष्याचे पाच आधारस्तंभ आहेत. रोगांचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात आणि अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येते. म्हणूनच समाजामध्ये अशा रोग निदान शिबिरांचे सातत्याने आयोजन करणे ही काळाची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले की, इंडियन रेड क्रॉस सोसायटी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिराचे नियोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर शाखेचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, उपसचिव डॉ. संजय घाटे, कोषाध्यक्ष सीए शादाब चिनी, प्रोजेक्ट डायरेक्टर अश्विनी खोबरागडे आणि डॉ. आशिष बारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. चंद्रपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी, एडवोकेट विक्रम टंडन उपाध्यक्ष अमन मारेकर.
सचिव एडवोकेट किनीकर एडवोकेट गिरीश मारल्यावर एडवोकेट आशिष धर्मपरिवार एडवोकेट बजाज सदस्य, एडवोकेट वैशाली कवाडे आणि स्वयंसेवकांनी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
या रोग निदान शिबिरामध्ये डॉ बी एच दाबेरे
डॉ कल्पना गुलवाडे डॉ. मनीषा घाटे डॉ प्रसाद पोटदुखे डॉ चेतन नागरेचा डॉ रोहन कोटकर डॉ अनुजा कोटकर,डॉ संदीप पिपरे, डॉ राहुल नगराळे, डॉ चैतन्य नंदावरे, डॉ उमेश सरोसे, डॉ आयुषी गुप्ता, डॉ अनुजा लोणकर, डॉ दीक्षाय वाकडे.
त्यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती

शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने ॲडव्होकेट, त्यांचे कुटुंबीय, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिकांनी घेतला. या उपक्रमामुळे अनेकांना प्राथमिक स्तरावर आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत औषधांचा लाभ मिळाला. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जनजागृतीचा उत्कृष्ट संगम असलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page