*शालार्थ आयडी घोटाळ्यात लिपिक निलंबित*
*ज्योत्स्ना वानखेडे*
विभागीय शिक्षण उपसंचालक *माधुरी सावरकर* यांनी प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक *राहुल देशमुख* यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या सीईओंना पत्र पाठवून कारवाई करण्यास सांगितले आहे.
उपसंचालकांनी पाठवलेल्या पत्रात, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी *चिंतामण वंजारी* यांच्या कार्यकाळात 100 बनावट शालार्थ आयडी तयार करून विविध शाळांमध्ये नियुक्त्या देण्याच्या कार्यालयीन प्रक्रियेत *देशमुख* यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
*एम. आर. बोरकर* यांनी शिक्षण आयुक्तालयात केलेल्या तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून स्वतः स्पष्ट अहवाल कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.