Monday, September 14, 2026
spot_img
HomePolice*चांदा पब्लिक स्कूल येथे तीन दिवसीय स्व-संरक्षण व सुरक्षा जनजागृती शिबिराचा सोहळा...

*चांदा पब्लिक स्कूल येथे तीन दिवसीय स्व-संरक्षण व सुरक्षा जनजागृती शिबिराचा सोहळा संपन्न;पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या हस्ते ‘सुरक्षा मंत्र’ पुस्तिकेचे वाटप*

*चांदा पब्लिक स्कूल येथे तीन दिवसीय स्व-संरक्षण व सुरक्षा जनजागृती शिबिराचा सोहळा संपन्न; पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या हस्ते ‘सुरक्षा मंत्र’ पुस्तिकेचे वाटप*

*ज्योत्स्ना वानखेडे*

श्री आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थिनींना स्वं-संरक्षण शिकविण्याचे उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ‘कम्युनिटी पोलीसिंग’ अंतर्गत चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर येथे इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष स्व-संरक्षण व सुरक्षा जनजागृती शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. दिनांक 20 ते 22 जुलै 2026 या कालावधीत आयोजित या शिबिराचा एकूण 450 शालेय विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

समारोपीय प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी हे स्वतः मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत सुरक्षिततेचे विविध पैलू समजावून सांगितले. या प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना ‘सुरक्षा मंत्र’ पुस्तिकेचे वाटप केले आणि तिचे नियमित वाचन करून दैनंदिन जीवनात सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. यामध्ये सहभागी विद्यार्थिनींना स्व संरक्षण प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

*तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन*

– *स्व-संरक्षण (कराटे प्रशिक्षण):* पोलीस अंमलदार प्रवीण रामटेके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने विद्यार्थिनींना कठीण प्रसंगात स्वतःचा बचाव करण्यासाठी कराटे व स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

– *पोक्सो कायदा (POCSO Act):* पोलीस स्टेशन रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी पोक्सो कायद्याबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थिनींना आपल्या हक्कांची व कायद्याच्या संरक्षणाची जाणीव करून दिली.

– *गुड टच – बॅड टच (Good Touch & Bad Touch):* भरोसा सेल चंद्रपूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांनी विद्यार्थिनींना गुड टच व बॅड टच यातील फरक समजावून सांगत असुरक्षित प्रसंगी प्रसंगावधान कसे राखावे, याबाबत मार्गदर्शन केले.

– *सायबर सुरक्षा व इंटरनेट:* सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे सहा.पोउपनि.मुजावर अली यांनी सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि इंटरनेटवर मुलींची सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन केले.

याशिवाय, शिबिरादरम्यान अमली पदार्थांविरोधी जनजागृती, वाहतूक नियम, ‘दामिनी पथक’ व ‘दामिनी हेल्पलाइन’ तसेच आणीबाणीच्या प्रसंगी *’Dial 112’* या आपत्कालीन क्रमांकाचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी पोलिसांचे विशेष जनजागृती रथ व दामिनी पथकाचे वाहनही उपस्थित होते.

सदर यशस्वी उपक्रमाबद्दल शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता जीवतोडे, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे विशेष आभार मानले. उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, कायदेशीर जनजागृती आणि स्व-संरक्षणाची भावना निश्चितच दृढ होईल असे मनोगत व्यक्त केले आहे.

——————————————————————————————————

*संपर्क:*

Email : sp.chandrapur@mahapolice.gov.in | Website : http://www.chandrapurpolice.gov.in

Facebook : SP Chandrapur | Instagram : chandrapur_police | X : spchandrapur

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page