Monday, September 14, 2026
spot_img
HomeHealth & Fitnessआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या रिक्त पदभरतीला गती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या रिक्त पदभरतीला गती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या रिक्त पदभरतीला गती

केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी पत्राद्वारे दिली माहिती; कर्मचारी निवड आयोगाकडे भरतीची सूचना पाठविल्याचे केले स्पष्ट

अतिरिक्त मनुष्यबळ, औषधपुरवठा आणि प्रशासकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी

चंद्रपूरातील लाभार्थ्यांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आ. मुनगंटीवार यांची धडपड

*Jyotsna Wankhede* : चंद्रपूर येथील केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (सीजीएचएस) वेलनेस सेंटरमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाशजी नड्डा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नड्डा जी यांनी रिक्त पदांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाकडे (एसएससी) सूचना पाठविण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. तसेच चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरमध्ये आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करणे आणि लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर येथील केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (सीजीएचएस) वेलनेस सेंटरद्वारे सुमारे ३,०३० लाभार्थ्यांना नियमित आरोग्य सेवा दिली जाते. मात्र डॉक्टर, औषधनिर्माता, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लाभार्थ्यांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. याशिवाय आवश्यक औषधी चंद्रपुरात उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना तब्बल १६५ किलोमीटर दूर नागपूरला जावे लागत असून वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून रिक्त पदे तातडीने भरणे, आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करणे आणि सीजीएचएस वेलनेस सेंटरची सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आ. मुनगंटीवार यांना पत्र पाठवून रिक्त पदांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाकडे सूचना पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही पाठपुरावा कायम ठेवत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षांना स्वतंत्र पत्र पाठवून भरती प्रक्रिया सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावी तसेच चंद्रपूरसह गरजू सीजीएचएस केंद्रांमध्ये रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे, अशी ठाम मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून केवळ प्रश्न उपस्थित करण्यापुरते न थांबता, त्या प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याची कार्यपद्धती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. चंद्रपूरातील हजारो केंद्रीय शासकीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा मिळविताना होणारा त्रास, औषधांसाठी नागपूरपर्यंत करावी लागणारी धावपळ आणि रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी संवेदनशीलतेने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरही त्यांनी पाठपुरावा थांबवला नाही, तर कर्मचारी निवड आयोगाकडे स्वतंत्र पत्र पाठवून भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. चंद्रपूरातील लाभार्थ्यांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा त्यामागील एकमेव उद्देश असून त्यांच्या सातत्यपूर्ण व परिणामकारक पाठपुराव्यामुळे या प्रश्नाच्या समाधानाची प्रक्रिया आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page