Tuesday, July 28, 2026
HomeSanghtanaविद्या भारतीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
spot_img

विद्या भारतीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विद्या भारतीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विदर्भ प्रांतात ६० विद्यालये व ३० शिशुवाटिका संलग्न

*ज्योत्स्ना वानखेडे*: विद्या भारती विदर्भ न्यासाची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी भारतीय उत्कर्ष मंडळ सभागृह, खापरी (परसोडी) येथील प्रांत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्ष स्थानी विद्या भारती विदर्भचे अध्यक्ष सचिन जोशी होते.
यावेळी व्यासपीठावर विद्या भारती पश्चिम क्षेत्र उपाध्यक्ष शेषाद्री डांगे, प्रांत मंत्री रोशन आगरकर उपस्थित होते. या प्रसंगी कोषाध्यक्ष अमित भालेराव, माजी अध्यक्ष रमेश धारकर, आजीवन सदस्य अशोक दवंडे, नानासाहेब खारपाटे यांच्यासह विदर्भ प्रांतातील सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत झालेल्या कार्यकर्ते पूर्वोत्तर संघटन मंत्री विराग पाचपोर, गुजरात प्रदेश संघटन मंत्री महेश पतंगे व राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शुभदा जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुर करण्यात आले.
सभेत सन २०२५-२६ चा वार्षिक कार्यवृत्त  सादर करण्यात आले. प्रामुख्याने शिशु वाटिका ताईंचे प्रशिक्षण, आचार्य प्रशिक्षण वर्ग, सरस्वती शिक्षा यात्रा, खेलकूद स्पर्धांमधील उपलब्धी, संस्कृती ज्ञान परीक्षेत 125 शाळांमधून 22 हजाराच्या वर विद्यार्थी परीक्षेला बसले इ. सर्व माहिती देण्यात आली. आगामी काळात वंदे मातरम् च्या दीडशेव्या वर्षानिमित्त 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता सामूहिक वंदे मातरम् गायन कार्यक्रम घेण्याचे आवाहन व संत शिरोमणी रोहिदासांच्या 650 व्या प्रकट वर्षा निमित्ताने विविध कार्यक्रम शाळांनी करावे असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्या भारती विदर्भ प्रांताच्या कार्याचा आढावा घेताना सध्या प्रांतात ६० विद्यालये व ३० शिशुवाटिका संलग्न असून भारतीय संस्कारप्रधान, गुणवत्तापूर्ण आणि राष्ट्रनिष्ठ शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात अधिकाधिक शाळांपर्यंत विद्या भारतीचे कार्य पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शनाने सभेचा समारोप झाला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page