पोलीस ठाणे रामनगर अंतर्गत *दि. 25/07/2026 रोजी* पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांना गोपनिय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, *नागपूर ते हैद्राबाद* चालणारी *D.N.R. ट्रव्हल्स* मध्ये अंमली पदार्थांची वाहतुक होत आहे.
अशी खबर मिळाल्याने सदर मिळालेली माहिती मा. वरिष्ठांना देऊन त्यांचेकडून कार्यवाही संबंधाने परवानगी प्राप्त झाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि *हनुमान उगले* सोबत पो.स्टाफ, पंच, फोटोग्राफर व अंमली पदार्थांची ओळख पटविणारे *दोन श्वान* यांचेसह रवाना होऊन,बातमीतील ट्रव्हल्स *चंद्रपूर येथे* येताच तिची कायदेशीर प्रक्रिया व परवानग्या पूर्ण करून पंच समक्ष श्वानांचे मदतीने झडती घेण्यात आली.
परंतु वाहनात बातमीतील हकीकतीप्रमाणे संशयीत माल मिळून आलेला नाही. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
*पोलिसांचे आवाहन:*
रामनगर पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की, यापुढे अवैध प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ व अंमली पदार्थ यांची वाहतुक करणाऱ्या आंतरजिल्हा व आंतरराज्य चालणाऱ्या ट्रव्हल्स ची माहिती घेऊन कार्यवाही करण्याची तयारी ठेवली आहे.
तरी ज्यांना याबाबत माहिती आहे किंवा माहिती मिळाल्यास *रामनगर पोलिसांशी संपर्क* करावा.