Friday, August 7, 2026
spot_img
HomeBhadrawati*दुचाकी चोरांना अटक: भद्रावती पोलिसांची कारवाई*

*दुचाकी चोरांना अटक: भद्रावती पोलिसांची कारवाई*

*दुचाकी चोरांना अटक: भद्रावती पोलिसांची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
*हकीकत याप्रमाणे आहे की,*
दिनांक *06/08/2026* रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे *भद्रावती डी.बी. पथकाने* एका *विधीसंघर्ष बालकाला* ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी एक विधी संघर्ष बालक यांच्यासोबत मिळून *भद्रावती व आजू-बाजूच्या परिसरातून* विविध ठिकाणावरून *दुचाकी वाहने चोरी* केल्याची कबुली दिली.
*जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली – एकूण 06*
सदर विधीसंघर्ष बालकांच्या ताब्यातून एकूण *06 चोरीच्या मोटरसायकली* जप्त करण्यात आल्या आहेत.
1.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-C-9024, कि. *30,000/-*
2.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-CC-4570, कि. *80,000/-*
3.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-N-2773, कि. *20,000/-*
4.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-BL-5130, कि. *30,000/-*
5.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-V-8128, कि. *30,000/-*
6.  *हिरो स्प्लेंडर प्लस* – क्र. MH-34-S-8539, कि. *30,000/-*
असा एकूण *2,20,000/- रु. चा मुद्देमाल* मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर विधी संघर्ष बालकांविरुद्ध *पोलीस स्टेशन, भद्रावती* येथे *गु.र.क्र. 724/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता* अन्वये गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे.
*कारवाई करणारी टीम:*
सदरची कार्यवाही *मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उप वि. पोलीस अधिकारी चंद्रपूर संतोष बाकल* यांच्या मार्गदर्शनात
*पो.नि. योगेश्वर पारधी, सपोनि विरेन्द्र केदारे* व गुन्हे शोध पथकातील *पोउपनि संतोष केदार, गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्ट्रूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, पो.स्टे. भद्रावती* यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page