गुरुपौर्णिमा निमित्त समरसता दीप महोत्सव उत्साहात संपन्न, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर चे आयोजन

*Jyotsna Wankhede*: आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समरसता दीप महोत्सव कार्यक्रम विधानसभा क्षेत्रातील तुकूम मंडळ, सिव्हिल लाईन मंडळ, बापूपेठ मंडळ, बंगाली कॅम्प मंडळ, बाजार मंडळ आणि ग्रामीण मंडळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. संत शिरोमणी श्री संत गुरु रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामाजिक समरसता, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रत्येक मंडळात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून संत गुरु रविदासजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी चर्मकार समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व समाजसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सत्कारमूर्तींनीही सामाजिक ऐक्य, समरसता आणि समाजउन्नतीसाठी पुढेही कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा जिल्हा महानगर प्रभारी वंदना हातगावकर, भाजप नेते प्रकाश देवतळे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, सुमित बेले, गणेश पिंपळकर, सुचिता लुटे, सुनीता पाटील, स्वप्नील वाढई, कल्पना शिंदे, शालू कन्नौजवार, तसेच महानगर, जिल्हा व मंडळ स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सर्वांनी विविध मंडळांमध्ये जाऊन दीप प्रज्वलन करून सामाजिक समरसतेचा संदेश दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गुरु रविदासजी महाराज यांच्या समता, मानवता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करून समाजातील सर्व घटकांनी एकात्मतेच्या भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
विधानसभा क्षेत्रातील सर्व मंडळांमध्ये आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमातून संत गुरु रविदासजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत सामाजिक समरसता आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.










