Thursday, July 30, 2026
spot_img
HomeBirthdayआ. सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर कार्यकर्त्यांचा विश्वास आहेत– राहुल...

आ. सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर कार्यकर्त्यांचा विश्वास आहेत– राहुल पावडे

आ. सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर कार्यकर्त्यांचा विश्वास आहेत– राहुल पावडे

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल पावडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे

चंद्रपुरात अभूतपूर्व प्रतिसाद; १,१२२ रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान, विविध समाजोपयोगी उपक्रमही उत्साहात संपन्न



*Jyotsna Wankhede*: आ. सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर आम्हा हजारो कार्यकर्त्यांचा विश्वास, आधार आणि प्रेरणास्थान आहेत. जनसेवा, विकास आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली त्यांची आत्मीयता हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन माजी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक श्री.राहुल पावडे यांनी केले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या अभियानात तब्बल १,१२२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

या उपक्रमांतर्गत गिरनार चौक, खेडुले कुणबी समाज भवन, एसटी वर्कशॉप चौक (तुकूम), बंगाली कॅम्प, शासकीय दूध डेअरीजवळ, रयतवारी, उत्तर भारतीय संघ (तुकूम), माता मंदिर (इंदिरानगर, मुल रोड) तसेच लोकसेवा मंगल कार्यालय (पडोली) येथे रक्तदान शिबिरे पार पडली. सर्व केंद्रांवर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

रक्तदान शिबिरांसोबतच वृक्षारोपण सप्ताह, शहरातील ६३ ठिकाणी महाआरती, दर्गा येथे गरजूंना ब्लँकेट वाटप, लहान मुलांना रेनकोट वितरण, गरजूंना ताडपत्री वाटप, ११ गावांतील विद्यार्थ्यांना नोटबुक व शालेय साहित्य वितरण, महाकाली मंदिर येथे मसाला भात वाटप, शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

यावेळी राहुल पावडे यांनी वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश प्रत्येक कार्यकर्त्याने कृतीतून समाजापर्यंत पोहोचविल्याचे सांगितले. नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल राहुल पावडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page