Friday, July 31, 2026
spot_img
HomePolice*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या महिला व...

*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या महिला व आरोपीस गुन्हे शोध पथक रामनगर पोलिसांनी केले जेरबंद*

*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या महिला व आरोपीस गुन्हे शोध पथक रामनगर पोलिसांनी केले जेरबंद*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
*हकीकत काय आहे?*
दिनांक *29/07/2026* रोजी रात्री पोलीस स्टाफसह पो.स्टे.ला हजर असताना गुप्त बातमी मिळाली की,
*माला मनोरंजन डे* रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, चंद्रपूर ही तिचा मुलगा *मानव मनोरंजन डे* याच्या मार्फतीने आपल्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीत आहे.
*कारवाई कशी झाली?*
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांची परवानगी घेऊन पंचासमक्ष आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली.
झडतीत देवघराशेजारी एक प्लॅस्टीक बोरी मिळाली. ती उघडून पाहिली असता त्यात *गांजा सदृश्य वनस्पती – हिरवे पाने, फुले, बिया व देठ* असलेला अंमली पदार्थ आढळून आला.
आरोपी महिलेला व मुलाला गांजाबाबत विचारले असता त्यांनी तो विक्रीकरिता आणला असल्याचे सांगितले.
*जप्त केलेला मुद्देमाल:*
1.  *गांजा:* एकूण वजन *1.220 किलो ग्रॅम* (बोरीसह)
2.  *निव्वळ गांजाचे वजन:* *1.160 किलो ग्रॅम*
3.  *एकूण किंमत:* *12,200/- रुपये*
*पुढील कारवाई:*
जप्त केलेल्या मुद्देमालावरून स.पो.नि. शिवाजी नागवे यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे. रामनगर येथे
*अपराध क्र. 957/26 कलम 8(क), 20(ब), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा., मा. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद चौगुले  सा. यांच्या मार्गदर्शनात
मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. शिवाजी नागवे, स.पो.नि. हनुमान उगले व इतर स्टाफ यांनी ही कारवाई केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page