*पोलीस स्टेशन भद्रावतीची कारवाई: 52 पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 9 आरोपींना अटक*
*ज्योत्स्ना वानखेडे*
*1. घटना कधी आणि कुठे घडली?*
दिनांक *30/07/2026* रोजी रात्रीच्या दरम्यान डोलारा तलाव, पंचशिल नगर, भद्रावती येथे काही इसम 52 तास जुगार पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजितचा खेळ खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
*2. पोलिसांनी काय कारवाई केली?*
माहिती मिळताच पो.स्टॉपसह घटनास्थळी रेड केली असता खालील 9 आरोपी मिळून आले:
1. *धिरज शंकर शेट्टी* – वय 32 वर्षे, रा. झिंगूजी वार्ड, भद्रावती
2. *रूषीकेश भांकर मडावी* – वय 25 वर्षे, रा. पंचशिल वार्ड, भद्रावती
3. *मुकेश वासुदेव सोना* – वय 35 वर्षे, रा. डोलारा तलाव, भद्रावती
4. *अजित शंकर शेट्टी* – वय 28 वर्षे, रा. किल्ला वार्ड, भद्रावती
5. *मन्नु वासुदेव सोना* – वय 38 वर्षे, रा. डोलारा तलाव, भद्रावती
6. *अमित ओमप्रकाश टेभुर्णे* – वय 26 वर्षे, रा. पंचशिल नगर, भद्रावती
7. *उमेश भामराव रणदीवे* – वय 35 वर्षे, रा. डोलारा तलाव, भद्रावती
8. *राकेश नामदेव कुळमेथे* – वय 35 वर्षे, रा. पंचशिल नगर, भद्रावती
9. *सोनु ज्ञानेश्वर ढेंगळे* – वय 36 वर्षे, रा. किल्ला वार्ड, भद्रावती
*3. काय जप्त करण्यात आले?*
आरोपींच्या अंगझडतीत व घटनास्थळावरून
*07 मोटार सायकल व 06 मोबाईल* असा एकूण *5,98,530/- रु.* चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*4. पुढील कारवाई:*
सदर आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन, भद्रावती येथे *अ.क्र.—- /2026 कलम 12(अ) मंजुका कायद्यान्वये गुन्हा नोंद* करण्यात आला आहे.
*5. ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, मा. उप वि. पोलीस अधिकारी चंद्रपूर संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. गजानन तुपकर, संतोष केदार, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड पो.स्टे. भद्रावती यांनी ही कारवाई केली.