आ. मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महाआरोग्य शिबिर
२ ऑगस्टला चंद्रपुरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा

*Jyotsna Wankhede*: आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत रविवार, २ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात भव्य निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राजीव गांधी महाविद्यालय, इंदिरा नगर, मूल रोड येथे होणाऱ्या या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार, मार्गदर्शन व औषधोपचार करणार आहेत.
शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मोफत रोगनिदान, नेत्र तपासणी, कॅन्सर रोगनिदान, रक्ततपासणी, आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिबिरात तपासणीनंतर ज्या रुग्णांना अधिक तपासण्या अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्या सर्व तपासण्या आणि उपचार संबंधित रुग्णालयात विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.










