लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम.
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरचे आयोजन
*Jyotsna Wankhede* : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, थोर समाजप्रबोधनकार आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा क्रांतिकारी मंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर, साहित्यरत्न, समाजप्रबोधनकार आणि वंचित-शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे महानगर कार्यालयात अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे लोकमान्य टिळक विद्यालय, सिव्हिल लाईन येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेसाठी आणि जनजागृतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत राष्ट्रीय विचार, सामाजिक समता आणि प्रबोधनाचा संदेश या महापुरुषांनी दिला असून त्यांच्या विचारांचे आजही महत्त्व कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा जिल्हा महानगर प्रभारी वंदना हातगावकर, नगरसेविका आशा देशमुख, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विमल काटकर, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष कौसर खान, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार आकापेल्लीवार, कार्तिक बोरेवार, शालू कन्नोजवार, दुर्गा वैरागडे, अनिता झाडे, रेश्मा पांडे, अंजु तोरे, भावना बरसागडे, शालिनी राऊत, वर्षा बोकडे, लता ब्राम्हणे, नफिसा पठाण, सपना सातपुते, वंदना हजारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.